बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा खासकरून तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. नुसरत अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लूकसाठीही चर्चेत असते. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात दिसणारी नुसरत, आता तिच्या पुढच्या ‘अजीब दास्तान्स’ या चित्रपटात व्यस्त आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
शेअर केलेल्या फोटोमध्ये नुसरत भरुचा जांभळ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये दिसली आहे. फोटो शेअर करताना नुसरतने जांभळ्या रंगाबद्दल तिचे प्रेमही व्यक्त केले आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, “पलपल पर्पल.”
यात नुसरत खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे आणि तिचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. नुसरतचा हा लूक केवळ तिच्या चाहत्यांनाच नव्हे, तर इतर सेलिब्रिटींनाही खूप पसंत पडला आहे. या फोटोवर कमेंट्स करत अनेक सेलिब्रिटींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे.
नुसरत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत फोटो व व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत राहते. तिच्या प्रत्येक लूकला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळते.
नुसरतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर २००६ साली तिने ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. २००८ मध्ये ती ‘कल किसने देखा’ या चित्रपट दिसली. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह सेक्स और धोखा’ हा तिचा पुढचा चित्रपट होता. २०११ मध्ये नुसरत लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’मध्ये दिसली होती. या चित्रपटाने अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच, यात ती कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.