Sunday, October 6, 2024
Home टेलिव्हिजन पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर व्यक्त केला आनंद

पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट शेअर व्यक्त केला आनंद

टेलिव्हिजन ते बॉलिवूड या मनोरंजन क्षेत्राच्या सर्वच माध्यमांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री अर्थात गौहर खान. मागील अनेक दिवसांपासून गौहर तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. मात्र आता गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती आई झाल्याची माहिती दिली आहे. १० मे २०२३ रोजी गौहर खानने एका मुलाला जन्म दिला आहे. याबद्दल तिने तिचा आनंद व्यक्त एक पोस्ट शेअर केली आहे.

बिग बॉसची विजेती असणारी गौहर खान मागील बऱ्याच काळापासून तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे सतत गाजत होती. तिचे फॅन्स तिच्या या गोड बातमीची कधीपासून वाट बघत होते. काही दिवसांपूर्वीच तिचे बेबी शॉवर झाले होते. गौहरने तिच्या सोशल मीडियावर तिचा आनंद व्यक्त करत हि गोड बातमी सर्वांना दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

गौहर खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत. १० मे २०२३ रोजी आम्हाला आमच्या आयुष्यातील आनंदाचा खरा अर्थ समजला आहे. आम्हाला मुलगा झाला असून, तुमच्या प्रेमाबद्द्दल आणि प्रार्थनेबद्दल खूप आभार. कृतज्ञ आणि नवीन पालक झैद आणि गौहर”. गौहरच्या या पोस्टवर तिच्या फॅन्ससोबतच सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स करत तिचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान २०२० साली गौहरने संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आणि नृत्यदिग्दर्शक असलेल्या जैद खानसोबत लग्न केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांवर ‘या’ अभिनेत्रीने लावला घृणास्पद आरोप; म्हणाली, ’15 वर्षांपासून लैंगिक शोषण…’
सलग 3 वर्षे ऑडिशनमध्ये अभिनेत्याला नाकारले गेले, ‘या’ चित्रपटाने रातोरात बनवले स्टार

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा