बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या स्पेशल अपिअरन्समुळे चर्चेत आहे. अलीकडेच मेट गालामध्ये आलिया तिच्या बेस्ट ड्रेसमुळे चर्चेत होती. यानंतर, ती आता हाऊस ऑफ गुच्चीच्या फर्स्ट इंडियन ग्लाेबल ब्रँडची अॅम्बेसेडर बनल्यामुळे चर्चेत आहे. या खास कार्यक्रमासाठी आलिया आज म्हणजेच मंगळवारी (दि. 16 मे)ला सेऊलला पोहोचली होती. जिथे तिचा कटआउट ब्लॅक ड्रेस आणि ट्रांसपेरेंट बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आलिया भट्ट (alia bhatt ) हिला गुच्ची क्रूझ 2024 फॅशन शोची ग्लाेबल ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आलिया इटालियन फॅशन हाऊससोबतच्या पहिल्या टूरवर दिसली. यावेळी आलियासोबत जोच्या पॉप ग्रुप न्यू जीन्सची गायिका हन्नी आणि हॉलिवूड अभिनेता डकोटा जॉन्सन यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. या खास क्षणासाठी आलियाने पोल्का-डॉट्स कटआउटसह सिल्व्हर लाइनिंग ड्रेस निवडला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत हाेती.
या खास क्षणात आलियाच्या ट्रांसपेरेंट बॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने गुच्ची जॅकीची 1961ची ट्रांसपेरेंट बॅग घेतली होती. यासोबत तिने बोल्ड आयलायनर आणि पोनीटेल बांधून केस खुले ठेवले होते. तिचा एकूणच लूक खूपच आकर्षक दिसत होता.
View this post on Instagram
आलिया भट्टच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री ये गॅल गडॉटसोबत पहिला हाॅलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोनमध्ये’ दिसणार आहे. याशिवाय आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.( bollywood actress alia bhatt stuns in cutout detail black dress at gucci cruise 2024 fashion show in seoul )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रत्येकाला ट्रॉफीसोबत फोटो हवा आहे, माझ्यासोबत नाही’, ऑस्कर विजेते गुनीत मोंगा यांचा माेठा खुलासा
नागिनसारखं डाेलत उर्फीने केला डान्स; युजर्स म्हणाले, ‘आ गई जंगली कहीं की…’