मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. ९० च्या दशकात मराठी चित्रपटांवर एकहाती राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणून वर्षा यांना ओळखले जाते. मराठीसोबतच त्यांनी हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली. सौंदर्य, प्रतिभा यासोबतच उत्कृष्ट नृत्याची देखील देणगी त्यांच्याकडे आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये तर वर्षा उसगांवकर हे नाव कोणी ओळखत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. एवढे मोठे प्रस्थ वर्षा यांनी तयार केले.
आज वर्ष चित्रपटांमध्ये कमी दिसत असल्या तरी त्यांनी आता त्यांचा मोर्चा मालिकांकडे वळवला आहे. मालिकांमध्ये वर्षा बऱ्यापैकी सक्रिय झाल्या असून त्या सोबतच नाटकांमध्ये देखील काम करत आहे. वर्षा यांना आजही अमाप फॅन फॉलवोइंग आहे. आजच्या पिढीतील तरुण देखील त्यांचे फॅन्स आहेत. असे असले तरी त्यांच्या करियरला वादांचे गालबोट लागले आहेच.
वर्षा या देखील अनेकदा वादांमध्ये अडकल्या आहेत. त्यांनी २००० साली रवीशंकर शर्मा म्हणजेच मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध संगीतकार रवी यांचे चिरंजीव असलेल्या अजय शर्मा यांच्याशी विवाह केला. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये संगीतकार रवी यांनी त्यांची सून वर्षा आणि मुलगा अजय हे त्यांचा छळ करत सांगितले होते. वर्षा, अजय आणि रवी यांच्यातील वाद एवढा टोकाला गेला होता की त्यांना कोर्टाची मदत घ्यावी लागली होती. या वादामुळे रवी यांनी वर्षा आणि अजय यांना आपल्या संपत्तीमधून बेदखल करत त्यांच्या मृत्यूनंतरही त्या दोघांना कधी बोलावण्यात येऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार रवी यांचं २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर त्याचे पार्थिव त्यांच्या मुलींकडे देण्यात आले होते.
रवी यांच्या निधनानंतर वर्षा आणि अजय यांनी रवी यांच्या घरावर कब्जा केला. मात्र रवी यांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये मुलाने आणि सुनेने त्यांना कोणतीही मदत न केल्यामुळे त्यांचे राहते घर त्यांच्या मुलींच्या नावावर केले होते. ओबतच रवी यांच्या संपत्तीवर अजय आणि वर्षा यांचा कोणताही हक्क नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले आणि कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संगीतकार रवी यांचे घर त्यांच्या मुलींना दिले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव