बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांची लाडकी लेक आलिया कश्यप नेहमीच साेशल मीडियावर सक्रिय असते. अशात आलिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्ह लाईफमुळे चांगलीच चर्चेत आहे. त्याचवेळी, आता बातमी समोर आली आहे की, तिने तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत एंगेजमेंट केली आहे. याची माहिती खुद्द आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दिली.
आलिया (aaliyah kashyap) हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, आलिया तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याचवेळी, दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना रोमँटिक स्टाईलमध्ये किस करताना दिसत आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये कपल खूप आनंदी दिसत आहे. आलियाने पोस्ट शेअर करताना एक रोमँटिक कॅप्शनही लिहिले आहे.
View this post on Instagram
आलियाने लिहिले, ‘आणि हे घडलं! माझा बेस्ट फ्रेंड, पार्टनर आणि आता माझा होणारा नवरा…तू माझं प्रेम आहेस. खरं आणि निस्वार्थ प्रेम काय असतं, ते दाखवल्याबद्दल थँक यू. तुला होकार देणं ही माझ्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट होती. तुझ्याबरोबर माझं संपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी मी उत्सुक आहे.’ हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडिया युजर्स दोघांचेही अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
मंडळी, आलिया शेन ग्रेगोयरला खूप दिवसांपासून डेट करत असून ते कायमच एकमेकांसाेबतचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर करत असे. (bollywood anurag kashyap daughter aaliyah kashyap got engaged with boyfriend shane gregoire shared romantic photos see)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ जाधवने लेकीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “…तेव्हा बापाचा आनंद Calm Down”
मुंबईतील वांद्रे येथे सलमान खान बांधणार 19मजली हॉटेल, ‘या’ सुविधांनी सुसज्ज असेल इमारत