Monday, June 23, 2025
Home कॅलेंडर भावा तू तर तुझ्यातली दोन माणसंच गायब केलीस! गणेश आचार्यने घटवलं तब्बल ९८ किलो वजन, पाहा नवा लूक

भावा तू तर तुझ्यातली दोन माणसंच गायब केलीस! गणेश आचार्यने घटवलं तब्बल ९८ किलो वजन, पाहा नवा लूक

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांचे नाव तर आपल्यापैकी अनेकांना माहिती असेलच. गणेश आचार्य म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो, तो धिप्पाड देहयष्टीचा माणूस. त्यांचे वजन आणि शारिरिक आकार पाहता सर्वसामान्य माणसापेक्षा ते अधिक होतं, यात शंका नाही. मात्र, तरीही नृत्याची आवड आणि अंगभूत कला याच जोरावर गणेश आचार्य बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक झाले.

मागील अनेक काही वर्षांपासून गणेश आचार्य यांनी आपल्या फिटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्यांनी जिम जॉइन केली होती. तासनतास जिममध्ये घालवू लागले. योग्य तो डाएट ट्रेनर कढून घेऊन तो फॉलो करू लागले. त्यांच्या जिम मधल्या मेहनतीचे व्हिडिओज सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.

याच अथक मेहनतीनंतर गणेश आचार्य यांचे संपूर्ण बदललेले नवे रुप येत्या शनिवारी आणि रविवारी द कपिल शर्मा शो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर या आठवड्यात द कपिल शर्मा शो मध्ये आपल्याला बॉलिवूडचे तीन यशस्वी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणजेच टेरेन्स लुईस, गीता कपूर आणि गणेश आचार्य हे पाहून म्हणून येणार आहेत. सोनी ने सोशल मीडियावर टाकलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कपिल या पाहुण्यांची मजा घेताना पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/tv/CIz2CvQHNf0/?utm_source=ig_web_copy_link

कपिल गणेश आचार्य यांना आल्या आल्या एक प्रश्न विचारतो,“सर किती किलो वजन कमी केलंत आपण?” यावर गणेश म्हणतात,”९८किलो!” यावर कपिल त्याच्या नेहमीप्रमाणे हजरजबाबीपणा दाखवत म्हणतो, “सर आपल्याकडे चाळीस -चाळीस किलोची दोन माणसं असतात. आपण आपल्या शरीरातून दोन माणसांना कमी केलंत!” यावर शो मध्ये एकच हशा पिकतो. टेरेन्स, गीता, अर्चना, कपिल आणि खुद्द गणेश या पंच वर मननमुराद हसतात.

या खेळीमेळीच्या वातावरणात कपिल गीता कपूर यांच्या सोबत फ्लर्ट करू लागतो. गीता कपूर सुद्धा त्याला योग्य साथ देतात आणि इतर मंडळी आता आम्ही निघायला हवं, असं म्हणत त्यांना चिडवत असतात.

अर्थात हा सगळा शोच्या विनोदाचा एक भाग आहे. कपिल शर्मा शोचे चाहते हे संपूर्ण जगभरात किती मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. हा भाग येत्या शनिवारी आपल्याला सोनी टीव्ही वर पाहता येणार आहे.

हे देखील वाचा