सतत वादांनमुळे चर्चेत असलेला ’72 हुरें’ 7 जुलै रोजी प्रदर्शित झाला. खरे तर, टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. ’72 हुरें’चे निर्मातेही कायदेशीर कचाट्यात अडकले. मात्र, अशात आता ’72 हुरें’च्या रिलीजबरोबरच या चित्रपटाबद्दलच्या रिव्ह्यूजही माेठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. चित्रपटाचे प्रमुख कलाकार पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. यासोबतच चित्रपटाची कथा आणि संकल्पनाही धक्कादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.
’72 हुरें’चा रिव्यू देताना एका युजर्सने ट्विटरवर म्हटले की, “फर्स्ट हाफ छान आहे, ब्लॅक अँड व्हाईट थीम छान काम करते, ब्रेनवॉशिंग सीन अप्रतिम आहेत. पवन मल्होत्रा दमदार आहे, तर सेकेंड हाफ थोडा स्लो आहे.” ,क्लायमॅक्स अधिक चांगला होऊ शकला असता, एकूणच चित्रपट चांगला आहे. यासह युजर्सने चित्रपटाला तीन स्टार दिले आहेत.”, तर दुसऱ्या युजर्सने म्हटले, “मी दहशतवादाच्या कृत्यांचा थेट साक्षीदार असल्यासारखे दिसते आहे, ते प्रेक्षकांना हादरवून सोडणार आहे. ’72 हुरें’ मूव्ही रिव्ह्यू: हा चित्रपट अतिरेकी आणि दहशतवादाचा गहन संबंध उघड करतो.” अशात एक युजर्स म्हणाला, “72 हुरेंवर बंदी घालण्याची गरज नाही. ती जगभरात रिलीज करा.”
⭐⭐⭐
72HoorainFirst half very good , black and white theme works so good,
????brain washing scenes are excellent????pawan Malhotra is best , little slow in second half , could have been better in the climax, overall nice????to watch.#MSDhoni???? #HappyBirthdayDhoni #crisisoverleg pic.twitter.com/U9CsRz3gdC— Suryansh Yadav (@a830cc746996444) July 7, 2023
’72 हुरें’चे दिग्दर्शन संजय पूरण सिंग चौहान यांनी केले आहे, जे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर अशोक पंडित हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात पवन मल्होत्रासोबत आमिर बशीरसह रशीद नाज, सरू मैनी आणि अशोक पाठक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
“Watching it feels like witnessing live acts of terrorism, shaking audiences to their core”.
’72 Hoorain’ Movie Review: Exposing the dark nexus of extremism and terrorism @ShillongTimesIn https://t.co/L1QxfZiRoS
— Anil Pande (@directanil) July 7, 2023
काही दिवसांपूर्वी ’72 हुरें’च्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सय्यद अरिफली महम्मदली नावाच्या व्यक्तीने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. चित्रपटात आपल्या धर्माचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासोबतच भेदभाव आणि द्वेषाला चालना दिली जात असून मुस्लिम समाजाची प्रतिमा जनतेमध्ये मलीन केली जात आहे. (bollywood movie 72 hoorain twitter review netizens says ashok pandit film starring pavan malhotra is hard hitting and gut wrenching)
अधिक वाचा-
–HAPPY BIRTHDAY | ’एमएस धोनी’ चित्रपटापेक्षा वेगळी आहे माहीची लव्हस्टोरी? ‘अशी’ झाली होती साक्षीसोबत पहिली भेट
–‘जवान’ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च हाेण्यापूर्वी नयनताराचा लूक झाला लीक? साेशल मीडियावर उडाली खळबळ










