Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये प्रेक्षकांसाठी मेजवानी, चित्रपटात झळकणार सोनाली कुलकर्णीचे खरे आई-बाबा

सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. प्रश्न पडला ना? कोण हे कलाकार? तर हे नवोदित कलाकार आहेत सोनाली कुलकर्णीचे आई – बाबा.

पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली. या चित्रपटात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर सोनालीलाही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे.

शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अंगद बेदीने 400 मीटर शर्यतीत जिंकले सुवर्णपदक, नेहा धुपियाने असे केले स्वागत व्हिडीओ व्हायरल
स्वतःचे वय ४८ सांगताच ट्रोल झाली मलायका अरोरा; यूजर्स म्हणाले, ‘५० सांगायला लाज वाटते का?’

हे देखील वाचा