बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे चर्चेत होती. या अफवांमुळे तिच्या चाहत्यांनाही मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, काल मुंबईतील एका फॅशन इव्हेंटमध्ये कॅटरिना फिट ड्रेसमध्ये दिसली आणि या अफवा एकदमच पूर्ण विराम मिळाला. कॅटरिनाच्या प्रेग्नेंसीच्या अफवांमुळे तिच्यावर अनेक टीकाही झाली होती. काही लोकांनी तिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. मात्र, कॅटरिनाने या अफवांवर कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती.
काल फॅशन इव्हेंटमध्ये दिसल्यानंतर कॅटरिनाने (Katrina Kaif) या अफवांवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला आहे. आता तिच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आहे. कॅटरिना ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या कॅटरिना तिच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कॅटरिना मुंबईतील एका फॅशन इव्हेंटमध्ये फिट ड्रेसमध्ये दिसली.
कॅटरिना हिरव्या रंगाचा फिट-रॅप ड्रेस परिधान करताना दिसली. कॅटरिनाने तिच्या हिरव्या रंगाच्या ड्रेससोबत सिल्व्हर हिल्स घातले होते. कॅटरिना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. कॅटरिनाचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांना अभिनेत्रीचा हा लूक आवडला आहे. अनेक चाहत्यांनी कॅटरिनाच्या सौंदर्याचे कौतुकही केले आहे. या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “तु खूप सुंदर आहे. खूप गोंडस.. तुझे हसणे..” दुसऱ्याने लिहिले की, “बॉलिवूडची राणी”
View this post on Instagram
कॅटरिनाकैफच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती लवकरच ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे, जो टायगर फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. सलमान खान आणि कॅटरिना स्टारर ‘टायगर 3’ हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे . या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. याशिवाय कतरिना कैफ ‘मेरी ख्रिसमस’मध्ये विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 15 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. (Bollywood actress Katrina Kaif video in green dress goes viral amid pregnancy rumours)
आधिक वाचा-
–तीन प्रसिद्ध अभिनेत्यांशी अफेअर असूनही मिळाले नाही खरे प्रेम, आजही अविवाहित आहे राणी चॅटर्जी
–प्रसिद्ध फिल्ममेकरचा रस्त्यावर तडफडून मृत्यू; मदत करायचं सोडुन लोकांनी त्याला लुटलं आणि…