Saturday, March 7, 2026
Home मराठी अमिताभ बच्चन यांचा प्राजक्ता माळीला थेट व्हिडीओ कॉल, अभिनेत्री म्हणाली, ‘किती भारी वाटलं..’

अमिताभ बच्चन यांचा प्राजक्ता माळीला थेट व्हिडीओ कॉल, अभिनेत्री म्हणाली, ‘किती भारी वाटलं..’

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरांत नाव कमावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कलाकार आहे. तिच्या “वाह दादा वाह…” या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील डायलॉगने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं जागा मिळवली आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांमध्ये एक अजय नावाचा स्पर्धक देखील आहे. हा अजय ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात अजयने तो प्राजक्ता माळीचा खूप मोठा चाहता असल्याचं अमिताभ बच्चन यांना सांगितलं.

अमिताभ बच्चन यांनी अजयला प्राजक्ता माळीला (Prajakta Mali)  फोन लावण्याची परवानगी दिली. यानंतर प्राजक्ताला फोन लावण्यात आला. फोनवर अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीचं अभिवादन केलं. प्राजक्ताने अजयला चांगलं खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय तू जिंकलास, तर आपण नक्की भेटू असंही तिने अजयला सांगितलं. यानंतर महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजूने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले व तुम्ही असंच आमच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेम करत राहा असं त्यांना सांगितलं.

प्राजक्ता माळीने हा संपूर्ण व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री लिहिले की, “अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोनवर बोलण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद झाला. अमिताभ बच्चन हे माझे बालपणाचे आदर्श आहेत. त्यांच्यासोबत बोलताना मला जणू स्वप्नचं पडले आहे असं वाटत होतं. हा अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. या मालिकेमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतील तिच्या साध्या, भोळ्या आणि सालस स्वभावाने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने ‘खो-खो’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिचे ‘प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.  (Amitabh Bachchan direct video call to Prajakta Mali)

आधिक वाचा-
‘भाभी’ फेम डॉली सोही झाली गर्भाशयाच्या कँसरची शिकार; म्हणाली, ‘ तुमच्याकडे ताकद असेल तर…’
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर अनन्या पांडेने खरेदी केले स्वतःचे आलिशान घर, सोशल मीडियावर दाखवली झलक

हे देखील वाचा