देशात नव्वदच्या दशकात ‘शक्तिमान’ हा पहिला टेलीव्हीजन सुपरहिरो म्हणुून अतिशय लोकप्रिय ठरला होता. लहान मुले तर या शोची अतिशय आतुरतेने वाट पाहत असायचे. याचे कारण अॅक्शनसह या शोच्या माध्यमातून शक्तिमान मुलांना विविध संदेश देखील द्यायचा. आता हाच शक्तिमान पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येणार आहे, पण नव्या स्वरुपात.
लवकरच शक्तिमान या सुपरहिरोवर चित्रपट येणार आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट अॅव्हेंजर्सप्रमाणे शक्तिमान देखील तीन पार्टमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे या चित्रपटात शक्तिमानचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे.
‘शक्तिमान’मध्ये गंगाधर आणि शक्तिमान अशा दोन मुख्य भूमिका होता. त्याच मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’चा सीक्वल येणार असल्याची माहिती दिली असून ते याचे प्रोड्यूसर असणार आहेत.
मुकेश खन्ना यांनी याबाबत बोलताना सांगितले की, लोकांना जाणून घ्यायचे आहे की, शक्तिमानचे काय झाले. याचे कारण लहाम मुलांमध्ये अद्यापही शक्तिमानची गोडी आहे. किंबहुना लॉकडाऊनमध्ये शक्तिमानचे पुनःप्रदर्शन झाल्यानंतर त्यात अधिक भर पडलेली आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट अधिक चांगल्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या चित्रपटाचे बजेट देखील जास्त असणार आहे. तसेच क्रिश आणि रावन या चित्रपटांपेक्षा याची भव्यता असेल, यासाठीच तो अधिक बजेटचा असेल असे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांचा समावेश केला जाणार आहे. मात्र, मुकेश यांना एका मोठ्या चेहऱ्याचा शोध असून तो चेहरा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही घोषणा करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
शक्तिमान या शो प्रमाणेच या चित्रपटाची कथा देखील वाईटावर चांगल्याचा विजय अशीच असणार आहे. तसेच या चित्रपटात मुकेश खन्ना हे स्वतः काम करणार आहेत की नाही, याबाबत मात्र कमालिची उत्सुकत आहे. मात्र, हे काहीही असले तरीही प्रेक्षकांना पुन्ही शक्तिमान पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने ते अतिशय आनंदीत आहेत. आता सगळ्यांना आस आहे ती चित्रपटाच्या घोषणेची आणि तारखेची.