Saturday, October 19, 2024
Home बॉलीवूड अरिजित सिंगची प्रकृती खालावली, ब्रिटनमधील कॉन्सर्टची तारीख बदलली

अरिजित सिंगची प्रकृती खालावली, ब्रिटनमधील कॉन्सर्टची तारीख बदलली

लोकप्रिय गायक अरिजित सिंग (Arjit Singh) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. यामुळे त्याने या महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या मैफली पुढे ढकलल्या आहेत. गायकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली असून कॉन्सर्ट रद्द केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्याने सांगितले की त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत, त्यामुळे तो ब्रिटनमध्ये कॉन्सर्ट करू शकत नाही. मात्र, त्यांनी नव्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

अरिजित सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत कॅप्शन आहे, ‘महत्त्वाचे अपडेट आणि माहिती’. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रिय चाहत्यांनो, काही वैद्यकीय परिस्थितींमुळे मला ऑगस्टमधील माझ्या मैफिली पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करताना मला खूप दुःख होत आहे. मला माहित आहे की तुम्ही या शोची किती आतुरतेने वाट पाहत आहात आणि हे शो होत नसल्याबद्दल मला खरोखरच दुःख आणि निराशा आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंबा हीच माझी ताकद आहे. पण, ही मैफल आणखी जादुई करण्याचा प्रयत्न करूया.”

अरिजीतने रद्द केलेल्या शोच्या नवीन तारखाही जाहीर केल्या आहेत. त्याच्या नवीन तारखा पुढीलप्रमाणे आहेत – 15 सप्टेंबर (लंडन) 16 सप्टेंबर (बर्मिंगहॅम) 19 सप्टेंबर (रॉटरडॅम) 22 सप्टेंबर (मँचेस्टर). नवीन कॉन्सर्टसाठी तुमची सध्याची तिकिटे वैध राहतील, असे सिंगरने म्हटले आहे. त्याने पुढे लिहिले, ‘तुमच्या समजुती, संयम आणि अतूट प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांसोबत सुंदर आठवणी निर्माण करण्यासाठी मी थांबू शकत नाही. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत आणि तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद.

पोस्टमध्ये अरिजित सिंगने आपली तब्येत बरी नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांचे काय झाले हे स्पष्ट झालेले नाही.अरिजित सिंह बॉलिवूडमधील सर्वात महागड्या गायकांपैकी एक आहे. गेली अनेक वर्षे ते चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते सुमारे 160 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

अरिजितचे चाहते त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजन आहात, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या’. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘लवकर बरे व्हा’. एका यूजरने लिहिले की, ‘काही गोष्टींची वाट पाहणे चांगले वाटते. आरोग्याची चांगली काळजी घ्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अनुष्का शर्मानंतर परिणिती चोप्रा पोहोचली लंडनमधील इस्कॉन मंदिरात, देवाच्या भक्तीत झाली लीन
हे बॉलिवूड कलाकार आहेत शुद्ध शाकाहारी; मांसाहाराला हातही लावत नाहीत

हे देखील वाचा