Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड सोनम कपूर करणार पुनरागमन; पुढील वर्षी सुरु होणार मोठ्या चित्रपटाचे शूटिंग…

सोनम कपूर करणार पुनरागमन; पुढील वर्षी सुरु होणार मोठ्या चित्रपटाचे शूटिंग…

सोनम कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती ‘रांझना’, ‘नीरजा’ इत्यादी चित्रपटांसाठी ओळखली जाते. सोनम बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. गर्भधारणा आणि मातृत्व विश्रांती झाल्यापासून ती कोणत्याही चित्रपटाचा भाग झालेली नाही. ती शेवटची २०२३ मध्ये आलेल्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसली होती. प्रेग्नेंसीपूर्वी तिने या चित्रपटाचे शूटिंगही केले होते. आता मुलगा वायुच्या जन्मानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतेच तीने तीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल उत्सुकता व्यक्त करत अभिनयावरील प्रेम व्यक्त केले आहे.

सोनम कपूर लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तीच्या पहिल्या प्रोजेक्टच्या शूटिंगबद्दल तीने नुकत्याच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, “माझ्या गरोदरपणानंतर पुन्हा कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी एक अभिनयप्रेमी व्यक्ती आहे आणि मला माझ्या व्यवसायामार्फत अनेक मनोरंजक पात्रे जगायला आवडतात.” सोनम म्हणाली की ती वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांपासून प्रेरित आहे आणि तिला वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. यादरम्यान तिने सांगितले की ती तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.

सोनमने खुलासा केला की ती २०२५ च्या सुरुवातीस तिच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत या प्रकल्पाबाबत जास्त बोलू शकणार नसल्याचे तिने सांगितले. अभिनेत्री पुढे म्हणाली, “हा एक मोठा चित्रपट आहे. एवढेच मी आत्ता सांगू शकते.” या आगामी प्रोजेक्टचे इतर तपशील सध्या गुपित ठेवण्यात आले आहेत. तथापि, OTT वर प्रसारित होणारी ही एक मोठी बजेट मालिका असेल अशी बातमी आहे. सोनम अनेकदा पती आणि मुलासोबतचे फोटो शेअर करत असते. मुलगा वायुच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त तीने इंस्टाग्रामवर एक खास पोस्टही शेअर केली आहे.

सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचा मुलगा वायुचा दुसरा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी वायुसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “माझे बाळ आज दोन वर्षांचे झाले. आमच्या प्रिय, प्रिय वायुला दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “तुझी आई होणे ही मला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. तू आमचे जीवन खूप आनंद, हशा आणि आश्चर्याने भरले आहेस. तू आमच्या जगात प्रकाश आणि आनंद आणला आहेस, प्रत्येक क्षण अधिक मौल्यवान बनवला आहेस. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

लग्नाविषयीच्या प्रश्नांवर बोलली प्राजक्ता माळी; मला बंधनात अडकण्याची भीती वाटते…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा