Friday, September 20, 2024
Home मराठी लग्नाविषयीच्या प्रश्नांवर बोलली प्राजक्ता माळी; मला बंधनात अडकण्याची भीती वाटते…

लग्नाविषयीच्या प्रश्नांवर बोलली प्राजक्ता माळी; मला बंधनात अडकण्याची भीती वाटते…

मराठी सिनेसृष्टीतील कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. कायमच आपल्या अभिनयाने, कामाने आणि सौंदर्याने प्राजक्ता प्रेक्षकांच्या आणि तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ललित प्रभाकर सोबत जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली प्राजक्ता अजूनही तितकीच प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. तिच्या कामाविषयी, येणाऱ्या चित्रपटांविषयी ती चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असते. 

खाजगी आयुष्यात मात्र प्राजक्ता अजूनही सिंगलच आहे. तिने अद्याप लग्न केले नाही.  आता प्राजक्ताने तिच्या या एकट्या राहण्याविषयी भाष्य केले आहे. यापूर्वी अनेकदा प्राजक्ताला तिच्या प्रेम संबंधांविषयी विचारलं गेलं आहे. मात्र यावेळी तिने यावर विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये तिने ती यापूर्वी अनेकदा प्रेमात पडली असल्याची कबुली दिली आहे. तसेच तीने अद्याप लग्न का केले नसून इथून पुढे तरी ती लग्न करणार आहे का याविषयी सांगितले आहे. प्राजक्ताला लग्नाविषयी भीती वाटत असल्याचं ती म्हणते… 

मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, मी प्रेमात पडते, पण मला लग्न आणि कमीटमेंट यांची भीती वाटते. मला सिंगल राहायला आवडतं. मी स्वतःची कंपनी एन्जोय करते. २०१३ पासून मी मुंबईत एकटी राहतेय. त्यामुळे मला त्या स्वातंत्र्याची सवय लागली आहे. एक कलाकार म्हणून मी मुक्त आहे. म्हणून मला बंधानात अडकण्याची भीती वाटते. आणि मुळात आजकाल ज्याप्रकारे लग्न संस्था विस्कळीत होत चालली आहे त्यामुळे तर हि भीती अजूनच वाढते. मी प्रेमात पडली आहे, पण मला कळलं की समोरची व्यक्ती माती खातेय त्यामुळे मग मी २-३ वेळा माघार घेतली आहे. 

प्राजक्ताने सुवासिनी या मालिकेतून मराठी कला विश्वात पदार्पण केलं होतं. तिने काही मालिका तसेच पांडू, खो खो, तांदळा आणि चंद्रमुखी आदी सिनेमांमध्ये काम केलंय. प्राजक्ता आता तिच्या आगामी फुलवंती या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

माझे मित्र माझ्या वडिलांसोबत दारू प्यायचे; रियाने सांगितल्या कठीण काळातल्या आठवणी…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा