चाहत्यांना टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’ खूप आवडतो. या शोमधील वीकेंड वॉरची प्रत्येकजण वाट पाहत आहे. या शोच्या वीकेंड का वारमध्ये मल्लिका शेरावत आली होती. या काळात मल्लिकाने सलमानसोबत केलेल्या मस्तीचा व्हिडिओही निर्मात्यांनी शेअर केला आहे. मल्लिकानेही सलमान खानसोबत शोमध्ये मस्ती करत डान्स केला.
या वीकेंड का वारमध्ये मल्लिका शेरावत सलमान खानसोबत (Salman Khan) मस्ती करताना दिसत आहे. या शोमध्ये मल्लिकाने सलमान खानला ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हटले होते. मल्लिका म्हणाली, “सलमान, तू माझ्या डोळ्यात बघ, त्यांना आग लागेल. माझ्या डोळ्यात तू आहेस, माझ्या हृदयात आहेस. हे ऐकून सलमानही हसायला लागतो. मल्लिकानेही सलमानसोबत डान्स करत त्याच्या गालावर किस केले.” यामुळे सलमान शरमेने लाल झाला.
राजकुमार राव, मल्लिका शेरावत आणि तृप्ती डिमरी सोबत, सुदेश लाहिरी, भारती सिंग आणि लाफ्टर शेफ्समधील कृष्णा अभिषेक देखील ‘बिग बॉस 18’ च्या पहिल्या वीकेंड का वारमध्ये दिसले होते. ‘विकी का वो वाला व्हिडिओ’चे स्टार्स बिग बॉस 18 मध्ये त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते.
मल्लिका शेरावतने बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. मल्लिका ‘विकी का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिने चंदाची भूमिका साकारली आहे, जी चाहत्यांना खूप आवडली आहे. तसेच, आजकाल मल्लिका तिच्या सिनेमातील अनुभवांबाबत केलेल्या विधानांमुळे खूप चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली, घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
‘भूल भुलैया 3’ रिलीज होण्यापूर्वी विद्या बालनने केली गूढ पोस्ट; म्हणाली, ‘मृतांना उखडून टाकण्यासाठी…’










