मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात. आता त्यातीलच एक मोठा पुरस्कार सोहळा पुण्यामध्ये आयोजित केला गेलेला आहे. संगीत क्षेत्रातील इंडिव्हिज्युअल गायक, गीतकार, संगीतकार यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा येत्या 9 मार्च 2025 रोजी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्याचे नाव MIMA म्हणजेच मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड असे आहे.
या सोहळ्यामध्ये मराठी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत अवतरणार आहेत. आणि संगीताची जादू आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध कॅटेगिरीसाठी कलावंतांना नामांकन मिळालेले आहे. आता यातील काही नामांकनाची यादी आपण जाणून घेणार आहोत.
या मीमा पुरस्कार सगळ्यांमध्ये लोकप्रिय गायिका वैशाली सामंत हिला मराठी इंडी म्युझिक आयकॉन हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांचा लाडका गायक स्वप्निल बांदोडकर याला देखील मराठी इंडी म्युझिक आयकॉन हा अवॉर्ड देण्यात येणार आहे. यासोबतच गायक आणि गीतकार अवधूत गुप्ते यांना देखील मराठी म्युझिक आयकॉन अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे या संगीत पुरस्कार सोहळ्यामध्ये गायक निलेश कटके यांना मराठी भक्ती गीत या कॅटेगिरीसाठी नामांकन मिळालेले आहे. त्याचप्रमाणे जयदीप वैद्य यांना देखील मराठी भावगीत कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालेले आहे. याचबरोबर प्रशांत मडपुवार यांना देखील मराठी भक्ती गीत या कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळाले आहे. गायिका श्रुती जैन हिला कोळीगीत या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालेले आहे. गायक ध्रुव त्रिकानाड याला देखील मराठी भावगीत पॉप या कॅटेगिरी मध्ये नामांकन मिळालेले आहे. त्याचप्रमाणे गायिका अरुणा अनगळ यांना देखील मराठी भावगीत या कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालेले आहे.
गायक विजय काजरेकर यांना मराठी क्लासिकल, सेमी क्लासिकल या कॅटेगिरी मध्ये नामांकन मिळालेले आहे. यासोबतच त्यांना मराठी लोकगीत या कॅटेगिरीमध्ये देखील नामांकन मिळाले आहे. गायिका कोमल कृष्णा हिला मराठी भावगीत कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालेले आहे. त्याचप्रमाणे संतोष पाटील यांना मराठी भावगीत या कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालेले आहे. यासोबतच गायिका भाग्यश्री गोडबोले हिला देखील मराठी भावगीत या कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालेले आहे.
त्याचप्रमाणे सगळ्यांची आवडती गायिका प्रियांका बर्वे हिला देखील भावगीत पॉप त्याचप्रमाणे भक्ती गीत या कॅटेगिरी मध्ये नामांकन मिळालेले आहे. ओमकार तरकसे याला मराठी भावगीत पॉप या कॅटेगिरीमध्ये नामांकन मिळालेले आहे. त्याचप्रमाणे संदीप उबाळे यांना मराठी लोकगीत या कॅटेगिरी मध्ये नामांकन मिळालेले आहे. यासोबतच दिग्पाल लांजेकर यांना मराठी भक्ती गीत या कॅटेगिरी मध्ये नामांकन मिळालेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘सनम तेरी कसम’ पासून ‘घिल्ली’ पर्यंत, हे चित्रपट झाले पुन्हा प्रदर्शित; या चित्रपटाने केली सर्वाधिक कमाई
उडता पंजाब २ वर काम सुरु; मुख्य भूमिकेसाठी एकता कपूरची पहिली पसंती शाहीदलाच …










