Monday, July 21, 2025
Home साऊथ सिनेमा कट पीस ड्रेसमध्ये दिसली सामंथा रुथ प्रभू, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

कट पीस ड्रेसमध्ये दिसली सामंथा रुथ प्रभू, नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)एका कार्यक्रमात सहभागी झाली. यावेळी सामंथाने तपकिरी रंगाचा कट-पीस ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पण नेटकऱ्यांना त्याचा हा लूक फारसा आवडला नाही.

या कार्यक्रमादरम्यान, सामंथाने एक सुंदर तपकिरी रंगाचा कट-पीस ड्रेस घातला होता. या फिटिंग ब्राऊन ड्रेसमध्ये समांथा खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होती. या ड्रेसच्या बाजूंना आणि काही भागात कट-आउट डिझाइन होते. सामंथाने जुळणारे हेल्स, सूक्ष्म मेकअप आणि वेव्ही केसांनी लूक पूर्ण केला. यादरम्यान, समांथाने डिझायनर क्रेशा बजाजसोबत आणि एकट्याने अनेक पोझ दिल्या.

चाहत्यांना सामंथाचा हा लूक खूप आवडला. पण नेटकऱ्यांना सामंथाचा हा लूक फारसा आवडला नाही. एका युजरने लिहिले, “ती दिवसेंदिवस इतकी विचित्र का दिसत आहे” तर दुसऱ्याने म्हटले, “तिच्या चेहऱ्याला काय झाले आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले, “मला वाटते की तिच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली आहे”. काहींनी तिचे वजन कमी केल्याबद्दल कौतुक केले, तर काहींनी तिला ट्रोल केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

स्पितीमध्ये हेल्मेटशिवाय बाईक चालवल्याने सोनू सूद अडचणीत, पोलिसांनी केला तपास सुरू
 जिस्म न करण्याचा बिपाशा बसूला मिळाला होता सल्ला; ‘तू एक चांगली अभिनेत्री आहेस आणि हा सिनेमा’…

हे देखील वाचा