लोकांची आवडती मालिका ‘बडे अच्छे लगते हैं’ आता नव्या सीझनमध्ये येणार आहे. या वेळी प्रेक्षकांना भाग्यश्री आणि ऋषभ ही नवी जोडी पाहायला मिळतेय. मोठ्या पडद्याचं आणि ओटीटीचं वेगळंच आकर्षण असतं, पण छोट्या पडद्याचे प्रेक्षकही काही कमी नाहीत. इथल्याही अनेक जोड्यांनी लोकांच्या मनात खास जागा बनवली आहे. अलीकडेच ‘बडे अच्छे लगते हैं’ ही मालिका नव्या सीझन मध्ये सुरू झाली आहे. यावेळी मालिकेत ऋषभ (हर्षद चोपडा) आणि भाग्यश्री (शिवांगी जोशी) ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. टीव्हीवर अशा अनेक जोड्या होत्या ज्या आजही लोकांना आवडतात आणि आठवत राहतात.
सीरियल- कसौटी जिंदगी की
2001साल मध्ये सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली. प्रेरणा आणि अनुराग बसु ही जोडी तर लोकांच्या मनात घर करून गेली. प्रेरणाची भूमिका श्वेता तिवारीने केली होती, आणि अनुरागचं पात्र सीझेन खानने साकारलं होतं. या मालिकेमुळे दोघंही खूप प्रसिद्ध झाले. ही मालिका 2008 मध्ये संपली, पण आजही लोकांना ती आठवते.
सीरियल- कहानी घर-घर की
2000 साल मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत एक मोठं मारवाडी कुटुंब दाखवलं होतं. या मालिकेत पार्वती आणि ओम यांची गोष्ट होती. पार्वती ही आदर्श सून होती तर ओम अग्रवाल आदर्श मुलगा दाखवला होता. पार्वतीची भूमिका साक्षी तंवर हिनं केली होती आणि ओमची भूमिका किरण करमरकर यांनी केली होती. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आणि ही जोडी टीव्हीवर खूप गाजली.
सीरियल- क्योंकि सास भी कभी बहू थी
ही मालिका एकदम गाजली होती आणि छोट्या पडद्यावर खूपच धमाल केली. तुलसीची भूमिका स्मृती इराणी हिनं केली होती. जी आता राजकारणात सक्रीय आहे. मिहिरची भूमिका सुरुवातीला अमर उपाध्याय हिनं केली, पण नंतर त्याच्या जागी इंद्र कुमार आणि रोनित रॉय यांनीही मिहिरचं पात्र निभावलं. तुलसी आणि मिहिर विरानी ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आणि टीव्हीवर जबरदस्त हिट ठरली.
सीरियल- ‘कहीं तो होगा’
‘कहीं तो होगा’ ही मालिका प्रेक्षकांच्या खूप आवडली होती. 2007 मध्ये आलेल्या या मालिकेत कशिश आणि सुजलची गोड प्रेमकहाणी दाखवली होती. कशिशची भूमिका आमना शरीफ हिनं केली होती आणि सुजलचं पात्र राजीव खंडेलवालनं निभावलं होतं. ही जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.
सीरियल- ‘कुमकुम-एक प्यारा सा बंधन’
‘कुमकुम’ ही मालिका लोकांना खूप आवडली होती. यात कुमकुम आणि सुमित ही जोडी प्रेक्षकां खूप आवडली होती. कुमकुमचं पात्र जूही परमार हिनं निभावलं होतं, आणि सुमितच्या भूमिकेत हुसैन कुवाजरवाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
महादेवाची नगरी काशीत पोहोचली अक्षरा सिंग, शिवाला समर्पित केली ‘जोगनिया’ गाणी