Saturday, April 18, 2026
Home बॉलीवूड राकेश रोशन रुग्णालयात दाखल, मानेवर झाली अँजिओप्लास्टी

राकेश रोशन रुग्णालयात दाखल, मानेवर झाली अँजिओप्लास्टी

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना १६ जुलै रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. तथापि, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.

दरम्यान, राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशनने माध्यमानाशी बातचीत केली ती म्हणाली, ‘हो, पप्पांच्या मानेवर अँजिओप्लास्टी झाली होती, पण आता ते पूर्णपणे ठीक आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही. ते आता विश्रांती घेत आहेत.’

यावेळी राकेश रोशनच्या कुटुंबातील सर्व सदस्य त्याच्यासोबत आहेत. मुलगा आणि सुपरस्टार हृतिक रोशन, हृतिकची मैत्रीण सबा आझाद आणि मुलगी सुनैना रुग्णालयात उपस्थित आहेत आणि त्याची काळजी घेत आहेत. या संदर्भात हृतिकची माजी पत्नी सुझान खानशी संपर्क साधला असता, तिने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आणि कुटुंबाशी संबंधित कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकत नसल्याचे सांगितले.

हृतिकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सच्या ‘वॉर २’ या पुढील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर दिसणार आहेत. या चित्रपटाचे आणखी एक पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. चाहते पुन्हा एकदा हृतिकचा अ‍ॅक्शन अवतार पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

रांझणा चित्रपटाच्या री-रिलिजवर संतापले दिग्दर्शकआनंद एल राय; म्हणाले, ‘एआय वापरून क्लायमॅक्स…’
या कारणामुळे मोहित सुरी आणि इमरान हाश्मी आता करत नाहीत एकत्र काम; मोहित म्हणतो आमच्यात वितुष्ट…

हे देखील वाचा