Saturday, April 25, 2026
Home बॉलीवूड एमएस धोनीला ४५ कोटी, तर मिल्खा सिंगने घेतला केवळ १ रुपया; जाणून घ्या बायोपिकसाठी कुणाला किती मिळाली रक्कम

एमएस धोनीला ४५ कोटी, तर मिल्खा सिंगने घेतला केवळ १ रुपया; जाणून घ्या बायोपिकसाठी कुणाला किती मिळाली रक्कम

क्रिकेट जगातील दिग्गज खेळाडू एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटातील धोनीचे पात्र दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने साकारले होते. माजी भारतीय क्रिकेट कर्णधाराच्या आयुष्यावर बनलेल्या या बायोपिकने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले होते. असे म्हटले जाते की, या चित्रपटासाठी धोनीने बरीच मोठी रक्कम घेतली होती. २०१६ मधील माध्यमांतील वृत्तांनुसार, धोनीने आपल्या आयुष्यावर आधारित चित्रपटासाठी तब्बल ४५ कोटी रुपये घेतले होते.

भाग मिल्खा भाग
‘फ्लाईंग सिख’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वेगवान धावपटू ‘मिल्खा सिंग’ यांनी आपल्या जीवनावर तयार केलेल्या बायोपिकसाठी पैसे घेतले नाहीत. ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये मिल्खा सिंगची भूमिका फरहान अख्तरने केली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर तरुण पिढी  फारच प्रभावित झाली होती. हे पाहून बर्‍याच तरुणांनी खेळाडू होण्याचे ठरविले, आणि अनेक पदके आपल्या नावे केली आहेत. मिल्खा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमोशनसाठी टोकन मनी म्हणून १ रुपये देण्याचे ठरविले. ही एक रुपयांची नोट १९५८ मध्ये छापली गेली होती. यामागील कारण देखील खूप मनोरंजक आहे. १९५८ मध्ये मिल्खा सिंग यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासातील कॉमन वेल्थ गेम्समधील, पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्याशिवाय आशियाई खेळात २ सुवर्णपदके जिंकून भारताचे नाव मोठे केले होते.

मेरी कोम
भारतीय बॉक्सिंग चॅम्पियन ‘एम सी मेरी कोम’च्या, संघर्षमय जीवनावरील बायोपिकमध्ये प्रियांका चोप्राने मेरीची भूमिका निभावली होती. मणिपूरच्या मेरी कॉमने २००१ मध्ये, प्रथमच राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चँपियनशिप जिंकली होती. यानंतर मेरीने मागे वळून पाहिले नाही. बॉक्सिंगसाठी तिला अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहे. एका अहवालानुसार, मेरी कॉमने तिच्या चित्रपटासाठी २५ लाख रूपये घेतले होते.

दंगल
आमिर खानचा चित्रपट ‘दंगल’ बॉक्स ऑफिसवर २ हजार कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘महावीर फोगाट’ यांच्या आयुष्यावर बनलेल्या, या चित्रपटात आमिरने महावीरची भूमिका साकारली होती. सुमारे ८० लाख रुपये महावीर फोगाट यांना देण्यात आले होते.

संजू
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर ‘संजू’ हा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट बॉलिवूडची यशस्वी बायोपिक मानली जाते. माध्यमांतील वृत्तांनुसार, संजयने निर्मात्यांकडून ९, १० कोटी रुपये घेतले  होते, आणि चित्रपट करण्याचे अधिकार दिला होता. याशिवाय संजय दत्तचा देखील चित्रपटाच्या नफ्यात वाटा होता. या चित्रपटात रणबीर कपूरने संजूची भूमिका साकारली होती.

छपाक
दीपिका पदुकोणने ऍसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावरील बायोपिक ‘छपाक’मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारली होती. माध्यमांतील वृत्तांनुसार, मेघना गुलजार यांनी लक्ष्मी अग्रवाला यांना, चित्रपटासाठी सुमारे १३ लाख रुपये दिले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकला नसला, तरीही हा चित्रपट चर्चेत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात झाला होता मोठा वाद; तब्बल १० हजार पाहुणे होते उपस्थित, खर्चाचा आकडा वाचून फिरतील डोळे

हे देखील वाचा