Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

फिटनेस असावा तर असा! शाहिद कपूरची पत्नी मीराने केला आंब्याच्या झाडाला लटकून व्यायाम; एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर (राजपूत) ही तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मीरा ही चित्रपटसृष्टीपासून खूप लांब आहे, तरी देखील ती नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. तिचा फिटनेस पाहून कोणीही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही की, ती दोन मुलांची आई आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिचे फिटनेसचे देखील व्हिडिओ वारंवार शेअर करत असते. अशातच तिचा एक फिटनेस व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मीराचा हा व्हिडिओ तिच्या सगळ्या प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तिने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती एका आंब्याच्या झाडाला दोरी बांधून व्यायाम करत आहे. या व्हिडिओमध्ये ती पुन्हा एकदा फिटनेस गोल सेट करताना दिसत आहे. मीरा राजपूतचा हे वर्कआउट सेशन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.

मीराने तिचा हा शानदार एक्सर्साइज व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “काहीतरी नवीन ट्राय केले आहे. आता निमित्त नाही.” मीराचा या व्हिडिओने तिच्या चाहत्यांना ही गोष्ट शिकवली आहे की, परिस्थिती कशीही असली, तरीही आपण आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये कोणतेही निमित्त आणायचे नाही.

खरं तर ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा मीराने तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर केले आहेत. या आधी देखील तिने तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना हैराण केले आहे. तिने आता शेअर केलेल्या या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तिचे चाहते तिच्या या व्हिडिओला कमेंट करून तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर

-क्या बात है! मिथुन चक्रवर्ती यांचा ‘डिस्को डान्सर’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिवाळीच्या आसपास होणार रिलीझ

हे देखील वाचा