[rank_math_breadcrumb]

रश्मिका–विजय यांच्या लग्नाची तयारी सुरू, उदयपूरमध्ये नवरीसारखा सजतोय वेन्यू; व्हायरल व्हिडीओत दावा..

रश्मिका मंदाना सध्या तिच्या चित्रपटांसोबतच विजय देवरकोंडासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका आणि विजय यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा रंगली होती. आता त्यांच्या लग्नाच्या बातम्याही जोर धरू लागल्या आहेत. रश्मिका किंवा विजय यांनी अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दोघे फेब्रुवारी 2026 मध्ये सात फेरे घेणार असून उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा विचार असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणी उदयपूरमध्ये रश्मिका–विजय (Vijay)यांच्या शाही लग्नाची तयारी सुरू असल्याचा दावा करताना दिसत आहेत.

‘तान्या’ नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने दावा केला आहे की उदयपूरच्या सिटी पॅलेसमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचे लग्न होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. व्हिडीओमध्ये पॅलेसमधील सजावटीची झलकही दाखवण्यात आली आहे. लाल रंगाचे भव्य पडदे, मोठे झुंबर आणि चित्रपटाच्या सेटसारखी भव्य मांडणी दिसून येते. तसेच खानपानाच्या साहित्याचीही झलक या व्हिडीओत पाहायला मिळते.

या व्हिडीओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही युजर्स ही बातमी खरी ठरावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत, तर काहींनी याला कलाकारांच्या प्रायव्हसीचा भंग असल्याचे म्हटले आहे. अनेक जण लग्नाच्या तारखेबाबतही प्रश्न विचारत आहेत.

ऑक्टोबर 2025 मध्ये रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा होती. या कार्यक्रमाला केवळ कुटुंबीय उपस्थित होते, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर रश्मिकाच्या हातातील अंगठी पाहून या चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र, दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.

रश्मिका आणि विजय यांनी 2018 मधील ‘गीता गोविंदम’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या. 2019 मध्ये आलेल्या ‘डिअर कॉमरेड’मध्येही ही जोडी एकत्र दिसली आणि त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली.

आता या व्हायरल व्हिडीओनंतर रश्मिका–विजय यांच्या लग्नाबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले असून, अधिकृत घोषणेची चाहत्यांना उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

 

हेही वाचा

साउथ सुपरस्टार राम चरण आणि उपासना यांच्या कुटुंबात नविन आनंद, जन्मले जुडवां बाळं