सनी देओल स्टारर ‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिसवर रिलीजपासूनच जोरदार कमाई करत आहे. 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 30 कोटींची ओपनिंग घेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्या वीकेंडला कमाईत मोठी वाढ झाली, मात्र 11व्या दिवशी अचानक कमाईत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
1997 मधील जे. पी. दत्तांच्या सुपरहिट ‘बॉर्डर’चा हा सिक्वेल असून, 28 वर्षांनंतरही चित्रपटाने प्रेक्षकांवर जुन्याच जादूची छाप सोडली आहे. मात्र रिलीजच्या दुसऱ्या सोमवारपासून बॉक्स ऑफिसवर वेग काहीसा मंदावल्याचे दिसते.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘बॉर्डर 2’ (Border 2)आता 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून फक्त काही पावलांवर आहे. आतापर्यंत भारतात चित्रपटाने एकूण 281 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या वीकेंडनंतर दुसऱ्या वीकेंडलाही चित्रपटाचा दबदबा कायम होता, पण दुसऱ्या सोमवारी कमाईत मोठी घट झाली.
पहिल्या 10 दिवसांत चित्रपटाने भारतात 275 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. दुसऱ्या शनिवारी सुमारे 17–18 कोटी, तर रविवारी 22–23 कोटींचा गल्ला जमवला. मात्र सोमवारी कमाई थेट घसरत फक्त 5.75 कोटींवर येऊन थांबली. तरीही एकूण कमाई 281 कोटींवर पोहोचली असून, 300 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आता फक्त 19 कोटींची गरज आहे. येत्या 1–2 दिवसांत हा टप्पा पार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील लोंगेवाला युद्धावर आधारित आहे. चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंग, सोनम बाजवा, आन्या सिंग आणि मेधा राणा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










