Tuesday, February 3, 2026
Home टेलिव्हिजन ‘अलिफ लैला’चा जिन्न आठवतोय का? अभिनेता आज छोट्या-मोठ्या इव्हेंट्समध्ये करतो काम

‘अलिफ लैला’चा जिन्न आठवतोय का? अभिनेता आज छोट्या-मोठ्या इव्हेंट्समध्ये करतो काम

९०च्या दशकात दूरदर्शनवर असे काही मालिकांचे वारे वाहू लागले होते, ज्यांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनातून उतरलेली नाही. ‘शक्तिमान’, ‘चंद्रकांता’, ‘आहट’, ‘विक्रम–वेताळ’ यांसारख्या मालिकांनी घराघरात आपली खास जागा निर्माण केली होती. त्या काळात टीव्ही केवळ मनोरंजनाचं साधन नव्हतं, तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणणारा माध्यम होता. याच काळात १९९३ मध्ये आलेली अरेबियन नाइट्सवर आधारित ‘अलिफ लैला’ ही मालिका प्रचंड गाजली.

रामानंद सागर लिखित आणि दिग्दर्शित, तर संजय खान निर्मित ‘अलिफ लैला’ ही एक फँटसी मालिका होती. या मालिकेत सीमा कनवाल, शहनवाज प्रधान, पिंकी पारिख, गिरीजा शंकर आणि दामिनी कनवाल शेट्टी यांसारखे कलाकार दिसले. मात्र या मालिकेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते ‘जिन्न’ या पात्राने. आजही ‘अलिफ लैला’ म्हटलं की जिन्न हमखास आठवतो.

‘अलिफ लैला’मधील जिन्नची भूमिका अभिनेता दयाल सिंह कश्यप (Dayal Singh)यांनी साकारली होती. मूळचे हरियाणातील करनालचे रहिवासी असलेले दयाल सिंह आधी पहलवान होते. मजबूत शरीरयष्टी आणि घनदाट आवाजामुळे ते या भूमिकेसाठी अगदी फिट बसत होते. रामानंद सागर यांच्या शोसाठी ऑडिशन देण्यासाठी ते गेले आणि जिन्नची भूमिका त्यांच्या वाट्याला आली. या भूमिकेमुळे ते रातोरात प्रसिद्ध झाले.

‘अलिफ लैला’नंतर दयाल सिंह कश्यप यांनी अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपट व मालिकांमध्ये प्रामुख्याने खलनायकाच्या भूमिका साकारल्या. मात्र, त्यांना फारशी मोठी व्यावसायिक यशस्वी कारकीर्द मिळू शकली नाही. सध्या ते छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सहभागी होतात आणि त्यातूनच आपली उपजीविका करतात. तरीही ९०च्या दशकातील प्रेक्षकांच्या आठवणींत ‘अलिफ लैला’चा जिन्न आजही जिवंत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

इंसान आणि आत्म्याच्या अनोख्या मैत्रीची कथा; सिनेमाघरांनंतर OTTवरही जबरदस्त कमाई, 30 कोटींत 150 कोटींचा गल्ला

हे देखील वाचा