Wednesday, February 4, 2026
Home टेलिव्हिजन ‘त्याच्यासारखी काळी तर होणार नाही ना?’ सपना चौधरीच्या वक्तव्यावर वाद, नाइजीरियन रॅपरवर केलेल्या टिप्पणीने अभिनेता भडकला

‘त्याच्यासारखी काळी तर होणार नाही ना?’ सपना चौधरीच्या वक्तव्यावर वाद, नाइजीरियन रॅपरवर केलेल्या टिप्पणीने अभिनेता भडकला

टीव्ही विश्वात एका नव्या रियालिटी शोने जोरदार एन्ट्री केली आहे. ‘द 50’ असे या शोचे नाव असून, यात टीव्ही आणि सोशल मीडियावरील तब्बल 50 प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले आहेत. ‘बिग बॉस’मधून प्रचंड लोकप्रिय ठरलेली हरियाणवी क्वीन सपना चौधरीही या शोचा भाग आहे. मात्र, शो सुरू होताच सपना एका वादात अडकली आहे.

नायजेरियन रॅपरवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद

‘द 50’ चा नुकताच प्रीमियर झाला असून, पहिल्या दिवसापासूनच सपना चौधरी (Sapna Chaudhary)आक्रमक पवित्र्यात खेळताना दिसत आहेत. दरम्यान, शोमधील एका संभाषणात त्यांनी नाइजीरियन रॅपर युंग सैमी, यांच्या त्वचेच्या रंगावर टिप्पणी केल्याचा आरोप होत आहे. सपना म्हणाल्या, “उन्हात गेल्यावर मी काळी तर होणार नाही ना?” असे म्हणत त्यांनी यंग सॅमीकडे बोट दाखवले. हा संवाद इतर स्पर्धकांना खटकला आणि शोच्या आतच नव्हे तर बाहेरही यावरून वाद निर्माण झाला.

करण पटेलने व्यक्त केली नाराजी

या घटनेनंतर अभिनेता करण पटेल यांनी इतर स्पर्धकांशी बोलताना सपना अनाहूतपणे वंशवादी टिप्पणी करत असल्याचे सांगितले. हे विधान वेगळ्या आणि अधिक योग्य पद्धतीने मांडता आले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अदनान शेखसोबतही जोरदार वाद

याच शोदरम्यान एका टास्कमध्ये सपना चौधरी आणि अदनान शेख यांच्यातही जोरदार वाद झाला. सपना यांनी अदनानला “बाहेर जाऊन कमावण्याची ताकद नाही का?” असे म्हटले. यावर अदनानने “चिल्लावू नकोस, बाई आहेस तर बाईसारखी राहा” असे उत्तर दिले. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि हा प्रकार सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला.

या संपूर्ण प्रकरणामुळे ‘द 50’ शो सध्या प्रचंड चर्चेत असून, सपना चौधरी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

हिंदू धर्मावरील विधानामुळे अभिनेत्री भोवऱ्यात, एकाच ओळीने पेटला होता मोठा वाद

हे देखील वाचा