Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा वध हा चित्रपट फ्लॉप होऊनही त्याचा सिक्वेल का बनवला? जाणून घ्या खरे कारण

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा वध हा चित्रपट फ्लॉप होऊनही त्याचा सिक्वेल का बनवला? जाणून घ्या खरे कारण

“वध” चित्रपट हा २०२२ मध्ये आला, तर या चित्रपटाचा सिक्वेल “वध २” नुकताच ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता अभिनीत हा क्राइम थ्रिलर चित्रपट असुन दिग्दर्शक जसपाल सिंग संधू यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.चित्रपटाची कथा आणि शक्तिशाली क्लायमॅक्सचे कौतुक केले जात असुन “वध २” ला त्याच्या रिलीजपासून प्रेक्षक कडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.मात्र या फ्लॉप चित्रपटाचा सिक्वेल का बनवला गेला हा प्रश्न कायम आहे आणि त्याचे खरे कारण आता माहित झाले आहे.

लव फिल्म्सचे निर्माते अंकुर गर्ग (Ankur Garg)गोव्यात झालेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलताना म्हणाले ,जरी चित्रपटगृहांमध्ये “वध” या चित्रपटाला तितकासा चांगला प्रतिसाद मिळाला नसला तरी “ओटीटी प्लॅटफॉर्मवर वध या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे आशा होती की दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर हिट होईल.”

“वध २” या चित्रपटाने थिएटरमध्ये काम पूर्ण केल्यानंतर, “वध २” लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होईल.  जसपाल सिंग संधू यांनी चित्रपटाची कथा यांनी लिहिली आहे, तर नेहा शितोळे आणि राहुल सैन यांनी अतिरिक्त पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लव रंजन यांनी लव फिल्म्स बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. वध २ चे बजेट ₹१० कोटी असल्याचे वृत्त आहे. तर या क्राइम थ्रिलरच्या ओटीटी रिलीज तारखेची अधिकृत पुष्टी अद्याप प्रतीक्षेत आहे.

सुरुवातीच्या अंदाजानुसार, “वध २” चित्रपटाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण हिंदी ऑक्युपन्सी ५.६० टक्के नोंदवली. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ₹०.२१ कोटी कमावले.संजय मिश्रा आणि नीना गुप्ता अभिनीत या चित्रपटाची सुरुवात कमी प्रेक्षकांमुळे मंदावली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘ओ रोमियो’ वर टांगती तलवार, शाहिद कपूरच्या चित्रपटाविरुद्ध या व्यक्तीने केली न्यायालयात याचिका दाखल

हे देखील वाचा