नितेश तिवारी (Nitesh tiwari) यांचा रामायण हा सिनेमा बहुप्रतीक्षित सिनेमांपैकी एक आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. चित्रपटात मोठी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. त्यामुळे सगळेजण या सिनेमासाठी खूपच उत्सुक आहेत. सिनेमात अभिनेता रणबीर कपूर श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही या सिनेमातील आणि कथेतील मुख्य पात्र आहेत. या व्यतिरिक्त देखील सिनेमात अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
जसे की,रवी दुबे लक्ष्मणच्या भूमिकेत तर सनी देओल आपल्याला हनुमाच्या भूमिकेत पाह्यला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमाची पहिली झलक देखील दाखवण्यात आली आहे. तसेच हा सिनेमा २ भागात बनवला जाणार असल्याची माहिती देखील निर्माते आणि दिगदर्शकांनी दिली आहे. चित्रपटातील कलाकारांबद्दल सतत नवीन अपडेट्स येत आहेत. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मेघनादच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्याचा विचार केला जात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, राघव जुयाल नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित “रामायण” चित्रपटाचा भाग होणार आहे. या चित्रपटात रणवीर कपूर, साई पल्लवी आणि यश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जुयाल या चित्रपटात मेघनादची भूमिका साकारण्याची अपेक्षा आहे. त्याचे पात्र “रामायण भाग २” मध्ये दिसणार आहे, जो २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
वृत्तानुसार, सुरुवातीला या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीचा विचार करण्यात आला होता, परंतु काही कारणांमुळे तो या प्रकल्पात सामील होऊ शकला नाही. त्यानंतर राघवला या भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला आणि त्याने लगेचच होकार दिला. राघव त्याच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करेल.
२०२३ मध्ये आलेल्या “किल” या चित्रपटात राघव जुयालला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर तो गेल्या वर्षी आर्यन खानच्या “द बॅड्स ऑफ बॉलिवूड” या पहिल्या शोमध्ये दिसला. पुन्हा एकदा राघवने त्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. आता, तो त्याच्या अभिनय कारकिर्दीला पुढच्या स्तरावर घेऊन जाणार आहे. तो एका दक्षिण भारतीय चित्रपटातही दिसणार आहे.
‘रामायण’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि यश यांच्याव्यतिरिक्त सनी देओल, रवी दुबे आणि साई पल्लवी हे कलाकारही दिसणार आहेत. हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान आणि हॉलिवूड संगीतकार हंस झिमर यांनी दिले आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग या दिवाळीत (२०२६) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘वाराणसी’ व्यतिरिक्त या भारतीय चित्रपटात दिसणार प्रियांका चोप्रा; चाहत्यांचा आनंद गगनात मावेना










