मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे खासकरून तिच्या सोज्वळपणासाठी ओळखली जाते. ती सतत तिचे पारंपारिक लूकमधील फोटो शेअर करत राहते. या सुंदर फोटोंमुळे ऋतुजा बऱ्याचवेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय देखील बनते. सध्याही या अभिनेत्रीची खूप चर्चा चालू आहे. मात्र, यावेळेस ती तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे. होय, नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमध्ये तिचा हॉट अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला, ज्यामुळे तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा चालू आहे.
ऋतुजा बागवेने अलीकडेच, तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती लाल रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये अतिशय अनोख्या अंदाजात पोझ देताना दिसली आहे. यातील अभिनेत्रीची अदा चाहत्यांना नव्याने तिच्या प्रेमात पाडत आहे. आता ऋतुजाच्या या पोस्टवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांशिवाय, मराठी कलाकारही तिच्या या बोल्ड लूकवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.
तर काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाचा हॉट ड्रेस परिधान करून, ऋतुजाने चाहत्यांना वेड लावले. टीव्हीवर साधीभोळी दिसणारी ऋतुजा आता बऱ्यापैकी हॉट झालेली दिसत आहे. यापूर्वीही तिने बऱ्याचदा आपला हॉट ऍन्ड बोल्ड अवतार चाहत्यांसमोर सादर केलेला पाहायला मिळाला. चाहत्यांनाही तिचा हा नवा अंदाज आवडल्याचे दिसून येत आहे.
सन २००८ मध्ये ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.
यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…