[rank_math_breadcrumb]

‘कल्कि 2898 एडी’ मध्ये कमल हासनच्या मानधनाबद्दल युगी सेतु यांच्याकडून मोठा खुलासा, किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का

चित्रपट निर्माता आणि अभिनेता असलेले युगी सेतू यांनी नुकतच ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटात कमल हासन यांनी घेतलेल्या मानधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे आणि हे ऐकून अनेकांना धक्का बसलाय. ‘कल्कि 2898 एडी’ च्या दुसऱ्या भागात कमल हासन (Kamal Hassan) यांची भूमिका आणखी मोठी असणार आहे. अशातच युगी सेतु यांनी एका मुलाखतीत बोलताना कमल हासन यांच्या फी बद्दल मोठा दावा केला.

युगी सेतु यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी कमल हासन यांना एका दिवसाच्या शूटसाठी 1 मिलियन डॉलर दिले गेले होते. ज्याच्यामुळ ते भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते ठरले आहेत. पण पुढे त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांची भेट चित्रपट निर्माता अश्विनी दत्त यांच्याशी झाली तेव्हा त्यांना खरी रक्कम कळाली. हे सांगताना युगी सेतु म्हणाले की “कल्कि 2898 एडी’ साठी 20 दिवसांच्या शूटसाठी कमल हासन यांना सुमारे 150 कोटी रुपये देण्यात आले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांना सांगितलं की ते भारतातील सर्वाधिक फी घेणारे अभिनेते झाले आहेत”

पुढे युगी सेतु यांनी सांगितलं की, “जेव्हा त्यांनी निर्माते अश्विनी दत्त यांच्याशी चर्चा केली तेव्हा खरी माहिती समोर आली, मी त्यांना सांगितलं की कमल हासनजींना भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा ऍक्टर बनवल्याबद्दल आणि 20 दिवसांसाठी 150 कोटी दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावर ते म्हणाले की ‘नाही सर, त्यांनी फक्त 10 दिवस शूट केलं आहे ” म्हणजेच हिशोब केला तर एका दिवसासाठी जवळपास 2 मिलियन डॉलर इतकं मानधन ठरतं. तसंच याआधी काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं होतं की ‘कल्कि 2898 एडी’ मध्ये काम करण्यासाठी कमल हासन यांनी 100 कोटींपेक्षा जास्त मानधन घेतलं आहे.

चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटात कमल हासन यांनी ‘सुप्रीम यास्किन’ नावाच्या गॉड-किंगची भूमिका साकारली आहे, जो कॉम्प्लेक्सवर राज्य करतो. चित्रपटाच्या शेवटी असा संकेत देण्यात आला आहे की पुढील भागात त्यांचा स्क्रीन टाइम आणखी वाढणार आहे.

त्याचबरोबर ‘कल्कि 2’ हा चित्रपट, जो ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, त्यात कमल हासन यांच्याबरोबर प्रभास, अमिताभ बच्चन, साई पल्लवी, दिशा पटानी आणि कीर्ती सुरेश यासारखे मोठे कलाकार दिसणार आहेत पण अजून याची रिलीज डेट समोर आलेली नाही .

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

मैटरनिटी फोटोशूटमध्ये एकमेकांत हरवले रणदीप आणि लिन लैशराम, आता लवकरच घरात गुंजणार बाळाचा आवाज