Sunday, June 22, 2025
Home अन्य ‘म्हणूनच तुला बॉयफ्रेंड नाहीये!’ म्हणत, अंकिता लोखंडेने बहिणीची उडवली खिल्ली; व्हायरल होतोय मजेदार व्हिडिओ

‘म्हणूनच तुला बॉयफ्रेंड नाहीये!’ म्हणत, अंकिता लोखंडेने बहिणीची उडवली खिल्ली; व्हायरल होतोय मजेदार व्हिडिओ

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या या मालिकेमधून खूप लोकप्रियता मिळवली आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने तिला घराघरात नेऊन पोहचवले. या मालिकेतील तिचा‌ सरळ आणि सोज्वळ स्वभाव प्रत्येकालाच भावला होता. ही मालिका संपल्यानंतर देखील अंकिताचे चाहते कमी झाले नाही. पण दिवसागनिक त्यांची संख्या वाढतच चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट. ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंकिता तिची बहीण आशिताला नेलपेंट लावत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासमोर अनेक नेलपेंट्स दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती आशिताला विचारते की, “तुला कोणी बॉयफ्रेंड आहे का?” यावर तिची बहीण, “नाही” असे उत्तर देते. यानंतर अंकिता तिला विचारते की, “तुला कशी नखं आवडतात लहान की मोठी ?” तिची बहिणी उत्तर देते की, “लहान.” यानंतर अंकिता म्हणते की, “म्हणूनच तुला कोणी बॉयफ्रेंड नाहीये!”

त्या दोघींचा हा संवाद इंग्लिशमध्ये चाललेला असतो. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अंकिताचे चाहते या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे.

अंकिताची बहिण आशिता ही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आशिताने मागच्या वर्षी एक फोटोशूट केले होते. यानंतर ती सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झाली होती.

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यांनतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मनिकर्णिका‌’या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी ३’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख सोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा