धुरंदर हा चित्रपट प्रचंड गाजला त्यानंतर आता याचा सेकंड पार्ट धुरंदर 2 हा येत आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वी धुमाकूळ घातला आहे. धुरंदर 2 ऍडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली आहे. भारतात नियमित शोचे बुकिंग अद्याप सुरू झालेले नसले तरी, प्रेक्षक त्याच्या प्रीमियर शो किंवा प्रीव्ह्यू शोला आधीच जोरदार प्रतिसाद देत आहेत. आदित्य धर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंग मधून जगभरात 60 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 13 मार्चच्या सकाळपर्यंत, चित्रपटाने राष्ट्रीय स्तरावर 4.7 लाख तिकिटे विकली आहेत, ज्याने 24.4 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी पवन कल्याणच्या “ओजी” ने सेट केलेल्या 25 कोटींच्या प्रीमियर रेकॉर्डला मागे टाकेल अशी अपेक्षा आहे. हा चित्रपटाच्या प्रचंड लोकप्रियतेचे प्रतिबिंब असलेल्या कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रीमियर असणार आहे.
रणवीर (ranveer)सिंग अभिनित हा चित्रपट आहे. तर धुरंदर 2चा उत्साह निर्माण करण्यासाठी, निर्मात्यांनी “धुरंधर” चा पहिला भाग थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित केला आहे. 1300 कोटी कमाई करणारा हा चित्रपट जगभरातील 500 स्क्रीनवर पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. “धुरंधर 2” च्या स्टारकास्टमध्ये रणवीर सिंगसह आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांचा समावेश आहे. पहिल्या भागात रहमान डकैतीची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाच्या कॅमिओचीही चर्चा आहे आणि यामी गौतमच्या विशेष भूमिकेच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










