Saturday, March 14, 2026
Home बॉलीवूड ‘धुरंधर’ अभिनेत्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये केली एन्ट्री ,तर रेहमानचा ऑन-स्क्रीन मुलगा म्हणून मिळवली होती ओळख

‘धुरंधर’ अभिनेत्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये केली एन्ट्री ,तर रेहमानचा ऑन-स्क्रीन मुलगा म्हणून मिळवली होती ओळख

टेलिव्हिजन वरती असे अनेक मालिका आल्या आहेत ज्या प्रसिद्धीमध्ये बॉलिवूड चित्रपटालाही मागे टाकले आहेत. त्यातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांनाच्या मनात स्थान निर्माण केले. आशीच एक मालिका म्हणजे  ये रिश्ता क्या कहलाता है, जी दीर्घकाळ चालणाऱ्या शोपैकी एक आहे. जी अनेक कालावधी पासुन सुरु आहे. तर आता या मालिकेमध्ये नवीन पात्राचा प्रवेश झाला आहे. तो म्हणजे  हितुल पुजाराने अरमानचा भाऊ आर्यन पोद्दार म्हणून शोमध्ये प्रवेश केला आहे. तर  पुजाराने या आधी ब्लॉकबस्टर चित्रपट “धुरंधर” मध्ये काम केले होते. धुरंधर मध्ये तो अक्षय खन्ना उर्फ ​​रहमान डकोइटचा ऑनस्क्रीन मोठा मुलगा नईम बलोचची भूमिका केली होती.

राजन (Rajan)शाही यांच्या बॅनरखाली निर्मित झाला आहे. “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालीकेत आगामी एपिसोड्समध्ये अनेक नवीन ट्विस्ट येणार आहेत. कारण हितुल पुजारा आर्यनच्या वेशात पोद्दारच्या घरात प्रवेश करतो, परदेशातून परतल्यानंतर एका धक्कादायक बातमीने खळबळ उडाली आहे. तसेच हितुल पुजाराच्या आधी आर्यन पोद्दारची भूमिका मंथन सेतियाने साकारली होती. या नवीन भूमिकेमुळे टीआरपी रेटिंगमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है हा सध्या नवव्या क्रमांकावर असलेला राजन शाहीचा शो आता या आठवड्यात सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर येत्या काही दिवसांत त्याच्या रेटिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. लीपनंतर घसरणारे रेटिंग लक्षात घेऊन निर्मात्यांनी कथेत आणि पात्रांमध्ये काही बदल केले आहेत. “ये रिश्ता क्या कहलाता है” ची कथा सध्या अभिरा-अरमानमधील दुरावा आणि आर्यनचे पोद्दारच्या घरात परतणे याभोवती फिरते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, ‘बॉर्डर २’ आता ओटीटीवर येणार; या ठिकाणी पाहू शकता सिनेमा

हे देखील वाचा