Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड 2016 मध्ये सुपरहिट झालेल्या चित्रपटासाठी या अभिनेत्याने दिवस-रात्र उपाशी राहून 28 दिवसात घटवले 18 किलो वजन

2016 मध्ये सुपरहिट झालेल्या चित्रपटासाठी या अभिनेत्याने दिवस-रात्र उपाशी राहून 28 दिवसात घटवले 18 किलो वजन

चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या भूमिका अगदी मनापासून करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. जेणेकरून प्रेक्षक त्या पात्रांना कधीच विसरत नाही. असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या भूमिकांमुळे आजरामर झाले. त्यांच्या नावापेक्षा ते साकारलेल्या पात्रांच्या नावांनी ओळखले जातात. तर बॉलीवूडचा हँडसम कलाकार म्हणजे रणदीप हुड्डा. याने 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्येही कशीच उत्तम भुमिका साकारली. त्याने त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना अश्रू अनावर केले होते. हा चित्रपट म्हणजे सरबजीत. 

या चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने 8-10 किलो नाही तर 18 किलो वजन कमी केले आणि तेही 28 दिवसांत. एका पॉडकास्ट दरम्यान, रणदीप हुड्डाने खुलासा केला की त्याने “सरबजीत” मधील भूमिकेसाठी 18 किलो वजन कमी केले. त्याने हे यश कसे मिळवले हे देखील त्याने स्पष्ट केले. संभाषणादरम्यान, रणदीप म्हणाला, “मला सांगण्यात आले होते की आपण प्रथम पंजाब भागाचे चित्रीकरण करू, ज्यामध्ये कुस्तीचे दृश्ये समाविष्ट होती. पण नंतर त्यांनी अचानक योजना बदलली. ते कोणत्याही नियोजनाशिवाय हे करत होते, म्हणून मी त्यांना विचारले, ‘तुरुंगात असलेला एखादा माणूस इतका निरोगी कसा असू शकतो?’ मग मी माझे अन्न सेवन कमी केले आणि त्याचा माझ्या शरीरावर खूप मोठा परिणाम झाला.

रणदीप (Randeep)हुड्डा यांनीही त्यांच्या परिवर्तनाचे रहस्य उलगडले. ते म्हणाले, “हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्मांमध्ये उपवासाची संकल्पना आहे आणि मी या संकल्पनेचा वापर करून वजन कमी केले. आणि म्हणाले लोक आता विविध प्रकारे उपवास पाळत आहेत. धान्य खाऊ नका, फळे खा. आपल्या देशात, लोक उपवासाच्या वेळी जास्त खातात. ते चुकीचे आहे. काहीही खाऊ नका. पाणी प्या, खाऊ नका. ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी, हे सर्व प्या. पण तुम्ही लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊ शकत नाही. उपवास तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे तुमचा लूक देखील सुधारतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

Oscars 2026: देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या हाय-स्लिट फेदर ड्रेसिंगची जादू नाही चालली, यावर चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया

हे देखील वाचा