Tuesday, March 17, 2026
Home बॉलीवूड राजपाल यादवचा हा चित्रपट विराटचाही फेव्हरेट; वारंवार पाहूनही थांबत नाही हसू, आता OTT वर आहे उपलब्ध

राजपाल यादवचा हा चित्रपट विराटचाही फेव्हरेट; वारंवार पाहूनही थांबत नाही हसू, आता OTT वर आहे उपलब्ध

राजपाल यादव हा बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार आहे. या अभिनेत्यांनी त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले. राजपाल यादव कॉमेडी भूमिका करून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. काही दिवसांपासून तो चेक बाउन्स या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. आणि या अभिनेत्याला तुरुंगात टाकण्यात आले होते तसेच 5 फेब्रुवारी रोजी त्याने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले होते नंतर त्याला जामीन्यावर सोडण्यात आले होते राजपाल यादवची असे अनेक चित्रपट आहेत जे दिग्गज व्यक्तींनाही खूप आवडतात असाच एक व्यक्ती म्हणजे विराट त्यालाही राजपाल यादवचा एक चित्रपट प्रचंड आवडतो.

राजपाल यादव यांने ‘भूल भुलैया’, ‘चुप चुप के’ आणि ‘मालमाल वीकली’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे विनोदी टायमिंग इतके भारी आहेत, की कोणीही खळखळून हसेल. विराट कोहलीनेही अशाच एका चित्रपटाचा उल्लेख केला, राजपाल यादवच्या त्या चित्रपटाबद्दल सांगितले ज्यामुळे तो इतका हसला की त्याच्या पोटात दुखू लागले. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला राजपाल यादवचा ‘ढोल’ हा चित्रपट खूप आवडला, विशेषतः त्यातील पानाचे दृश्य, जे पाहून तो खळखळून हसला.

विराट (virat)कोहलीने एका मुलाखतीत सांगितले की ‘ढोल’ हा त्याचा आवडता चित्रपट आहे. आपल्या आवडत्या चित्रपटाचा विराट कोहली संदर्भ देत तो म्हणाला, तुम्ही तो ” चित्रपट पाहिला आहे का? त्यात एक संवाद आहे: जेव्हा ते दुकान उघडण्याची योजना आखत असतात, तेव्हा कुणाल खेमू म्हणतो, ‘तुमच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या एखाद्या गोष्टीचे नाव सांगा. राजपाल यादव उत्तर देतो, “थुंकणे.” हा असा चित्रपट आहे की तो प्रत्येक वेळी पाहताना माझे हसणे थांबत नाही. तर या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 6.6 रेटिंग मिळाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

द 50; रजत दलालने दिग्विजय राठीला केलं नॉमिनेट,तर दिव्या अग्रवालचा मिळाला सपोर्ट

हे देखील वाचा