पवन कल्याण साउथ मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तर तो सध्या एका गोष्टीमुळे चर्चा आहे. ते म्हणजे त्याचा एक चित्रपट येत आहे. आणि त्याचे नाव आहे उस्ताद भगत सिंग. हा चित्रपट उद्या म्हणजेच 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. तर हा थेट बॉलिवूड चित्रपट धुरंधर 2 शी टक्कर देणार आहे. कारण धुरंधर 2 ही उद्द्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र उस्ताद भगत सिंग हा चित्रपट मूळतः 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण ‘टॉक्सिक’ हा चित्रपट पुढे ढकलल्यामुळे, पवन कल्याण यांनी आपला चित्रपट 19 मार्च रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
‘उस्ताद भगत सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’ शी स्पर्धा करत आहे. तर धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. आणि उस्ताद भगत सिंग’च्या ॲडव्हान्स बुकिंगची आकडेवारी समोर येत असून, ती ‘धुरंधर’पेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसत आहे. सेकनिलकच्या आकडेवारीनुसार, ‘उस्ताद भगत सिंग’ला ॲडव्हान्स बुकिंगमधून आतापर्यंत 12.4 कोटी रुपये मिळाले आहेत. धुरंधर 2’ ने ॲडव्हान्स कलेक्शनमधून आधीच 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
रणवीर (ranveer)सिंगच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आधीच इतिहास रचला आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार असलेल्या ‘धुरंधर 2’ चे प्रिव्ह्यू आजपासून सुरू होतील. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येही अपवादात्मक कामगिरी केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
7 वर्षांपूर्वी आलेल्या या सिरीजला 8.7 IMDB रेटिंग, तर तीनही सीझन आहेत सुपरहिट


