[rank_math_breadcrumb]

धुरंदर 2: कमाईच्या बाबतीत खरा ‘धुरंधर’ कोण? अक्षय खन्ना ते रणवीर सिंह यांच्या फी बाबत घ्या जाणुन

रणवीर सिंग अभिनीत धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होतात आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. तर  धुरंधर 2 चित्रपटाच्या सोबतच स्टारकास्टच्या मानधनामुळेही चर्चा आहे.

वृत्तानुसार, रणवीर (ranveer)सिंग या चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेत आहे. विशेष म्हणजे, मागील  धुरंदर भागासाठीही त्याचे मानधन इतकेच असल्याचे वृत्त होते. जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट देऊनही रणवीर सिंगसारख्या सुपरस्टारला मानधनात वाढ न मिळाली नाहीय.

ऑनलाइन पसरलेल्या अफवांनुसार, पहिल्या भागात कायमचा ठसा उमटवणाऱ्या अक्षयला, फ्लॅशबॅक सीन्स आणि कॅमिओसाठी 2.5 कोटी रुपये दिले जात असल्याचे वृत्त आहे. त्याच्या प्रति-मिनिटाच्या मूल्याच्या तुलनेत, चित्रपटाचा मुख्य खलनायक असलेल्या अर्जुन रामपालला, चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मिळत असल्याचे वृत्त आहे, तर अर्जुन रामपालला 150% अधिक मानधन दिले जात आहे. तर संजय दत्तला 10 कोटी रुपये, आर. माधवनला 9 कोटी रुपये आणि सारा अली खानला 1 कोटी रुपये मिळतील असे वृत्त आहे.

‘धुरंधर 2’ मधील कलाकारांचे मानधन पहिल्या भागाच्या मानधनासारखेच असे वाटते, मात्र  या आकड्यांना अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नसला तरी, एक गोष्ट निश्चित आहे: चित्रपटाच्या यशामुळे त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक कलाकाराच्या कारकिर्दीला मोठी चालना मिळाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

धुरंधर 2’समोर फिकी पडली पवन कल्याण यांची ‘उस्ताद भगत सिंह? एडव्हान्स बुकिंगमध्येच दिसत आहे कमकुवत कामगिरी