आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट १९ मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती.
आदित्य धर (dhar)दिग्दर्शित, बहुप्रतिक्षित चित्रपट ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा काल प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाल्याने चाहते खुप उत्साहीत होते, तर या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, दानिश पंडोर, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाच्या तिकीट दरही अगदीच लक्षणीय होते. दिल्ली-एनसीआरसारख्या प्रमुख शहरांमध्ये, सशुल्क प्रिव्ह्यूची तिकिटे 300 ते 2400 पर्यंत आहेत, ज्यामुळे हा अलीकडच्या काळातील सर्वात प्रीमियम अर्ली-एक्सेस रिलीजपैकी एक ठरला आहे. जास्त किंमत असूनही, सुरुवातीचे कल प्रेक्षकांची तीव्र आवड दर्शवतात आणि चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाने अधिकृत प्रदर्शनापूर्वीच जगभरातील ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
आजच्या लाईव्ह अपडेट्समध्ये देशभरातील चित्रपटगृहांमधील चित्रपटाची सद्यस्थिती, प्रेक्षकांच्या पहिल्या प्रतिक्रिया आणि सुरुवातीच्या बॉक्स ऑफिस निकालांचा मागोवा घेतला जात आहे. मात्र चित्रपटाची खरी गती आणि पहिल्या दिवसाची अचूक कामगिरी 19 मार्च रोजी व्यापक प्रदर्शनानंतरच कळेल. तर चित्रपटाची मागणी इतकी जास्त आहे की मध्यरात्रीनंतरचे शोदेखील हाऊसफुल्ल सुरू आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने नवा आदेश जारी, अंतरिम जामिनाची मुदत वाढवली










