Thursday, March 19, 2026
Home बॉलीवूड अल्लू अर्जुनने केले रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे कौतुक

अल्लू अर्जुनने केले रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे कौतुक

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती.

आदित्य धर (Dhar)दिग्दर्शित धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. कार्तिक आर्यनपासून अनन्या पांडे, अल्लू अर्जुन आणि प्रिती झिंटापर्यंत सर्वांनी ‘धुरंधर 2’ पाहिला आहे. तसेच या चित्रपटाचे कौतुकही केले आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनने धुरंधर 2 चित्रपट बुधवारी पाहिला. आणि ‘स्वॅग असलेला देशभक्तीपर चित्रपट अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याने आर. माधवन आणि रणवीर सिंग यांच्यासह संपूर्ण कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. आपल्या फेसबुक हँडलवर, अल्लू अर्जुनने चित्रपटाचे वर्णन ‘हाय-एनर्जी देशभक्तीपर मनोरंजन’ असे केले आणि त्याच्या प्रभावी दृश्यांची व दमदार अभिनयाची प्रशंसा केली. अल्लू अर्जुनने लिहिले, “आत्ताच ‘धुरंधर 2’ पाहिला. स्वॅग असलेला देशभक्तीपर चित्रपट.” प्रत्येक देशभक्ताला अभिमान वाटायला लावणारा चित्रपट आहे असे म्हणले आहे.

प्रीती झिंटाने ‘धुरंधर 2’ चे कौतुक केले, त्याला एक खरोखरच अद्भुत सिनेमॅटिक अनुभव म्हटले आहे. आणि असे अनेक दिग्गजांकडून धुरंदर चित्रपटांसाठी उत्तम प्रतिक्रिया आहेत आहे. तसेच अनेक चित्रपटांचे या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर किती कमाई करेल हे पाहण्यासारखे राहील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

चैत्र नवरात्री 2026; मनोज तिवारींचं ‘ममता की छांव’ नवरात्री गीत झाले रिलीज

हे देखील वाचा