‘धुरंधर २‘ (Dhurandhar 2) हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच तो चर्चेचा विषय बनला आहे. प्रदर्शित झाल्याच्या एका दिवसातच पाकिस्तानातही त्याची चर्चा झाली होती. आता पाकिस्तानातील लोकही ‘धुरंधर २’ चा आनंद घेत आहेत, पण चित्रपटगृहांमध्ये नाही… तर टीव्हीवर.
पाकिस्तानातील लोक टीव्हीवर ‘धुरंधर २’ पाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खालिद महमूद खालिद नावाच्या एका पत्रकाराने इन्स्टाग्रामवर ‘लाहोरमध्ये धुरंधर २ पाहत आहे’ असे पोस्ट केले. या पोस्ट्स आता व्हायरल होत असून, लोक पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत.
धुरंधर चित्रपटासाठी संशोधन सल्लागार म्हणून काम केलेल्या आदित्य राज कौल यांनी आपली निराशा व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “दुर्दैवाने, धुरंधर: द रिव्हेंजची पायरेटेड आवृत्ती आज पाकिस्तानात पोहोचली आहे.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, एका पाकिस्तानी पत्रकाराने याला दुजोरा दिला असून तो आपल्या होम स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद घेत आहे.
ही संपूर्ण घटना उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. काही लोकांनी पायरसीबद्दल चिंता व्यक्त केली, तर काहींनी पाकिस्तानला ट्रोल केले. आदित्य राज कौलने आपल्या पोस्टमध्ये असेही लिहिले की, “चित्रपटात पाकिस्तानवर टीका केली असली किंवा तो दहशतवादावर आधारित असला तरी, पाकिस्तानी भारतीय सिनेमाशिवाय जगू शकत नाहीत.”
“धुरंधर २” १९ मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला. SACNILC नुसार, “धुरंधर २” ने पहिल्याच दिवशी ₹१०२.५५ कोटींची कमाई केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘हीरामंडी द डायमंड बाजार’ नंतर ताहा शाह बदुशा या सिरीजमध्ये करण जोहरसोबत करणार काम










