Monday, March 23, 2026
Home बॉलीवूड बॉक्स ऑफिस सुनामीनंतर OTT वर कधी झळकणार धुरंधर 2? आधीच जाणून घ्या कुठे होणार स्ट्रीमिंग

बॉक्स ऑफिस सुनामीनंतर OTT वर कधी झळकणार धुरंधर 2? आधीच जाणून घ्या कुठे होणार स्ट्रीमिंग

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. तसेच धुरंदर हा चित्रपट गाजलाच मात्र धुरंदर मधील गाणे हे तितकेच गाजले आहेत आणि आता धुरंदर 2 मध्येही अनेक उत्तम गाण्यांचा समावेश आहे जे चित्रपटाला परिपूर्ण करतात.

रणवीर (Ranveer)सिंगचा अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. आणि प्रेक्षक आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्हीही चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी  एक माहिती आहे.  ‘धुरंधर’चा पहिला भाग नेटफ्लिक्सवर उपलब्ध होता, परंतु निर्मात्यांनी दुसऱ्या भागासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. जर तुम्ही ‘धुरंधर २’ देखील नेटफ्लिक्सवर यावा अशी आशा करत असाल, तर तुम्हाला तुमचा सबस्क्रिप्शन प्लॅन बदलावा लागेल. वृत्तानुसार, जिओ हॉटस्टारने चित्रपटाचे डिजिटल हक्क विकत घेतले आहेत.

जिओ हॉटस्टार आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये डिजिटल स्ट्रीमिंगसाठी एक मोठा करार झाला आहे. धुरंधर 2 जरी अधिकृत प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी, चित्रपटसृष्टीच्या नियमांनुसार कोणताही मोठा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर साधारणपणे आठ आठवड्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

धुरंदर 2ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई, गदर चित्रपटालाही टाकले मागे

 

हे देखील वाचा