[rank_math_breadcrumb]

अक्षय कुमारने सांगितलं फिटनेस मंत्र सूर्यास्तापूर्वी या गोष्टी करण्याची केली शिफारस

चित्रपटसृष्टीतील सर्वात फिट सेलिब्रिटींची नावे घ्यायची झाली, की बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचे (Akshay Kumar) नाव नेहमीच आठवते. पडद्यावर आणि पडद्यामागेही त्याचे असलेले समर्पण चाहत्यांना थक्क करते. माध्यमांशी झालेल्या संभाषणात, ५८ वर्षीय अक्षय कुमारने आपला फिटनेस मंत्र सांगितला. “मी नेहमीच एकच तत्त्व पाळले आहे: सूर्यास्तापूर्वी, म्हणजेच संध्याकाळी ६:३० च्या आत रात्रीचे जेवण करणे. यापेक्षा मोठा जीवनमंत्र कोणीही देऊ शकत नाही. डॉक्टरसुद्धा हेच सांगतील,” असे अक्षय म्हणाला.

यापूर्वी, अक्षय कुमारने रेडिओवरून लोकांना आवाहन केले होते, “तुमची जीवनशैली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बदला, एखाद्या चित्रपट तारकाच्या शारीरिक रूपावर नाही. अभिनेते अनेकदा पडद्यावर जसे दिसतात तसे नसतात. अनेक फिल्टर्स आणि स्पेशल इफेक्ट्स वापरले जातात. ते पाहून आपण आपले शरीर बदलण्यासाठी चुकीचे शॉर्टकट वापरू लागतो.”

तो पुढे म्हणाला, “आजकाल बरेच लोक स्टिरॉइड्स घेतात आणि सिक्स-पॅक आणि एट-पॅक मिळवतात. मित्रांनो, अशा शॉर्टकटमुळे शरीर बाहेरून फुगते पण आतून पोकळ होते. लक्षात ठेवा, शॉर्टकट तुमचे आयुष्य कमी करू शकतो. तुम्हाला दीर्घकालीन फिटनेसची गरज आहे, शॉर्टकटची नाही.”

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘भूत बंगला’मध्ये दिसणार आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट १० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. अक्षय व्यतिरिक्त, यात वामिका गब्बी, असरानी, ​​राजपाल यादव, परेश रावल, तब्बू आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

8 एपिसोडची हि सीरीज, तंत्र-मंत्र आणि भीतीदायक रहस्यांनी भरलेली कथा, अन् असा मृत्यूचा खेळ पाहून अंगावर येईल काटा