Tuesday, March 24, 2026
Home बॉलीवूड रजनीकांतनी ‘धुरंधर 2’चं केलं कौतुक, अन् आदित्य धरला म्हणले ‘बॉक्स ऑफिसचा बाप’

रजनीकांतनी ‘धुरंधर 2’चं केलं कौतुक, अन् आदित्य धरला म्हणले ‘बॉक्स ऑफिसचा बाप’

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 18 मात्र हा चित्रपट  मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि आता ही तो सुपर हिट ठरत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित धुरंदर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सध्या धुमाकूळ घालत आहे. आणि हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे, तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनीही हा चित्रपट पाहिला असून तो आवर्जून पाहण्यासारखा असल्याचे म्हटले आहे. तसेच हा चित्रपट पाहुन रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर चित्रपटबाबात भावाना व्यक्त केले आहेत. त्यांनी लिहले आहे की, काय चित्रपट आहे… #धुरंधर 2, आदित्य धर, बॉक्स ऑफिसचा बाप आहे. रणवीर आणि संपूर्ण कलाकार व क्रूचे खूप खूप अभिनंदन. प्रत्येक भारतीयाने आवर्जून पाहावा असा चित्रपट. जय हिंद.

आता आदित्य धरने (Dhar)यावर प्रतिक्रिया लिहिले, “सर, तुम्ही.” अनेक दशके आम्हाला आनंद दिला आहे. आणि तरीही त्याच सहजतेने हे सर्व करत राहिल्यानंतर हि खरोखरच एक जादू आहे असे वाटते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही ‘धुरंधर 2’ नक्की पाहावा असे घोषित करता, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा ‘सुपरस्टार’ क्षण आहे असे वाटते. मी खुप आभारी आहे. सर, या गोष्टीने थेट माझ्या हृदयाला स्पर्श केलाय. जय हिंद. तर आता धुरंधर 2 ने जगभरात तब्बल 751.97 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

करीना कपूरने रणबीर कपूरला म्हटले भारतातील सर्वोत्तम अभिनेता; म्हणाली. ‘त्याचे अभिनयावर प्रेम आहे..’

हे देखील वाचा