हर्षिल कालिया ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सध्या तिच्याबाबत एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे.सोमवारी जयपूरमध्ये कार अनियंत्रित झाल्याने डिव्हायडरला धडकल्याने अभिनेत्री हर्षिल कालिया हिचा मृत्यू झाला आहे. रात्री सुमारे 11.30 वाजता हा अपघात जयपूरमधील शिप्रा पथ रोडवर घडला. सीसीटीव्ही फुटेज मध्ये असे दिसले आहे की तिची कार डिव्हायडरला धडकून उलटली, तर स्थानिकांनी कार सरळ करून तिला बाहेर काढले.आणि लगेच तिथल्या स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी ती जीवित नसल्याचे सांगितले.
पोलिस आता अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कार भरधाव वेगात होती की दुसऱ्या वाहनाने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता याचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. हर्षिल कालिया (kalia)हिने ‘क्राईम नेक्स्ट डोअर’ या वेब सीरिजमध्ये काम केले होते, तसेच एका वृत्तवाहिनीसाठी अँकर म्हणून काम केले होते. तर राजस्थानी गाण्यांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका ती साकार करत असत. आणि मॉडेलिंग क्षेत्रातही तिने उत्तम काम केले आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भरधाव वेगाने जाणारी एक कार नियंत्रणाबाहेर जाऊन थेट डिव्हायडरला धडकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या भीषण अपघातात अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. या बातमीने अभिनेत्रीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ग्लॅमर विश्वातील तिच्या जवळच्या लोकांनी शोक व्यक्त केला, तर तिच्या जाण्याने सर्व चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘धुरंधर 2’च्या यशानंतर आता अर्जुन रामपाल हा OTT सिरीजमध्ये झळकणार










