आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र 18 हा चित्रपट मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. तर सध्या अभिनेता विकी कौशलने दिग्दर्शक आदित्य धरच्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ आणि त्याचा सिक्वेल ‘धुरंधर: द रिव्हेंज’ बद्दल आपले मत व्यक्त केले.
अभिनेता विकी (vicky)कौशलने दिल्लीत आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने धुरंधर: द रिव्हेंज चित्रपटाबद्दल आणि कलाकारांची भरभरून प्रशंसा केली. विकी म्हणाला कि, धुरंधर’साठी इतकी क्रेझ पाहून मला खूप आनंद होत आहे. मला पहिला भाग खूप आवडला होता. मी अजून दुसरा भाग पाहिलेला नाही, पण आदित्य एक उत्तम चित्रपट निर्माता आहे, त्याने उत्तम कलाकार निवडले आहेत, आणि मला खूप आनंद आहे की सर्वांना हा चित्रपट इतका आवडत आहे. मी मुंबईत परत जाताच तो पाहणार आहे.
विकी कौशलने 2019 मध्ये आदित्यच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तो शेवटचा मराठा साम्राज्याचे दुसरे शासक संभाजी यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या ऐतिहासिक ॲक्शन चित्रपटात दिसला होता. विकी आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रीमा लागूंची हुबेहूब प्रतिमा, मृण्मयी लागूच्या फोटोंमध्ये दिसते रीमा लागूंची हुबेहूब झलक









