Thursday, March 26, 2026
Home बॉलीवूड ‘धुरंधर 2’ अवघ्या एका आठवड्यात केली 1000 कोटींची कमाई, 7 दिवसांत 7 मोठे विक्रम काढले मोडीत

‘धुरंधर 2’ अवघ्या एका आठवड्यात केली 1000 कोटींची कमाई, 7 दिवसांत 7 मोठे विक्रम काढले मोडीत

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आणि आता तर रिलीज झाल्यापासुन ‘धुरंधर २’ ने बॉक्स ऑफिसवर  धुमाकुळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शीत हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे आणि यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत.

‘धुरंधर 2’ या चित्रपटाने 7 दिवसांत 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर ही काही साधी गोष्ट नाही. या चित्रपटाने केवळ आपल्या आधीच्या चित्रपटाचे यशच मागे टाकले नाही, तर अनेक जुने बॉक्स ऑफिस विक्रमही मोडून काढले आहेत. ‘धुरंधर 2’ जगभरात 1000 कोटी रुपयांची कमाई करणारा सर्वात वेगवान चित्रपट ठरला आहे.

धुरंधर 2 या चित्रपटाने 7 दिवसांत 7 विक्रम केले आहेत. या चित्रपटाने 7 दिवसांत 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आणि पुष्पा 2 नंतर असे करणारा तो दुसरा चित्रपट ठरला. तर 745 कोटींची देशांतर्गत बॉक्स ऑफिस कमाई करून, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे, केवळ सात दिवसांत परदेशात तब्बल 260 कोटींची कमाई करून, हा परदेशात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘पुष्पा 2’ चा निव्वळ कमाईचा विक्रम मागे टाकत, हा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा एक-भाषिक हिंदी चित्रपट ठरला आहे.1000 कोटींहून अधिक कमाई करून, जागतिक स्तरावर 7 दिवसांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.जागतिक बॉक्स ऑफिसच्या प्रतिष्ठित क्लबमध्ये 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. 1000 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा हा 5वा हिंदी चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सस्पेन्स आणि भीतीचा जबरदस्त कॉम्बो, 148 मिनिटांचा हा हॉरर-थ्रिलर चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंडिंग

हे देखील वाचा