Sunday, August 10, 2025
Home अन्य श्वास रोखून धरा! हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री लावणार ‘इंडियन आयडल १२’ मध्ये हजेरी

श्वास रोखून धरा! हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री लावणार ‘इंडियन आयडल १२’ मध्ये हजेरी

सध्या टेलिव्हिजनवर अनेक रियॅलिटी शो चालू आहे. मात्र, ‘इंडियन आयडल’ हा अतिशय मोठा, प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा शो आहे. याच शोने अनेक चांगले आणि मोठे गायक सिनेसृष्टीला दिले आहेत. असे असूनही मागील काही काळापासून हा शो सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. एका मागून एक असे अनेक आरोप या शोवर केले जात असून, आरोप करणारी मंडळी देखील अतिशय दिग्गज आहेत.

असे असूनही या वादांकडे लक्ष न देता हा शो आणि शो मधील स्पर्धक त्याच्या सादरीकरणाकडे लक्ष देत असतात, आणि प्रत्येक आठवड्याला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला कोणी तरी स्पेशल गेस्ट येतात. रसिकांना देखील या आठवड्याला कोण खास पाहुणे येणार याची उत्सुकता असतेच. या आठवड्याच्या खास पाहुण्यांच्या नावावरून नुकताच पडदा उठवण्यात आला आहे.

या आठवड्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झीनत अमान या शो मध्ये हजेरी लावणार आहेत. त्यामुळे शो मध्ये असलेल्या स्पर्धकांनी झीनत अमान यांना त्यांची हिट गाणी गाऊन एक ट्रिब्यूट दिले आहे. झीनत अमान या त्यांच्या काळातील सर्वात मादक आणि दमदार अभिनेत्री म्हणून आजही ओळखल्या जातात. त्यांनी असंख्य सिनेमांमध्ये काम केले आहे.

आता झीनत अमान यांची या आठवड्यात इंडियन आयडलमधील हजेरी आणि त्यात त्यांच्या अनेक खुमासदार आणि अविस्मरणीय आठवणींचा खजिना त्या याप्रसंगी उघडणार आहे. त्यामुळे या आठवड्याचा इंडियन आयडल हा शो नक्कीच बहारदार होणार आहे यात कोणतीच शंका नाही. खरं तर हिमेश रेशमियाचेही पुनरागमन झाले आहे.

तत्पूर्वी काही आठवड्यांपूर्वी या कार्यक्रमात गायक अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी एका मुलाखतीदरम्यान या शो वर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांनंतर गायिका सुनिधी चौहान आणि या शो च्या पहिल्या पर्वाचा विजेता असलेला गायक अभिजित सावंत यांनी सुद्धा या शो वर आरोप केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा