Friday, March 27, 2026
Home वेबसिरीज उत्तम रेटिंग असलेली हि सीरिज ज्याने यूट्यूबवरच गाजवला इतिहास, 10 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत पात्रं

उत्तम रेटिंग असलेली हि सीरिज ज्याने यूट्यूबवरच गाजवला इतिहास, 10 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत पात्रं

आज-काल ओटीटी कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण ओटीटीवर नवनवीन कन्टेन्ट, तसेच घरबसल्या अनेक प्रकारच्या सिरीज मालिका चित्रपट पाहू शकतो. तर आता ott वर अशा अनेक मालिका उपलब्ध आहेत. मात्र ओटीटीच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेली आणि युट्युब वर अतिशय प्रसिद्ध झालेले ही मालिका म्हणजे ‘ टीवीएफ पिचर्स’. या या मालिकेला आयएमडीबीवर 9.1 रेटिंग देखील आहे. यातिल कलाकांरानी साकारलेल्या भुमिकांमुळे आजही यातील पात्रे प्रक्षकांच्या स्मरणात आहेत.

10 वर्षांपुर्वीच्या या मालिकेची निर्मिती टीव्हीएफ, ‘द व्हायरल फीवर’ने केली होती. 2015 मध्ये जेव्हा ही मालिका प्रदर्शित झाली, तेव्हा भारतात ओटीटीचे जग नुकतेच आकार घेत होते. या मालिकेला यूट्यूबवर इतके प्रेम मिळाले की ती एक क्रेझ बनली. तर ही मालिका ‘द व्हायरल फीवर’ नावाच्या प्रोडक्शन हाऊसने तयार केली होती. आणि सर्वात जास्त जी 2015 मध्ये हिट झाली.

मालिकेची कथा चार तरुण व्यावसायिकांभोवती फिरते, ज्यांना आपल्या नोकरीपेक्षा काहीतरी वेगळे सुरू करायचे आहे. ही तीन पात्रे, नवीन बन्सल, योगेश (yogish)पांडे आणि सौरभ मंडल, वेगवेगळ्या नोकऱ्या करणारे मित्र आहेत. पण या मालिकेत जितेंद्र माहेश्वरी नावाचा आणखी एक नायक आहे. जो चांगली कमाई करतो असतो. तर तो नुकतेच लग्न करून मुंबईत स्थायिक झाला आहे. हे चार मित्र स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहतात, आणि गुंतवणूकदारांना सतत आपले प्रस्ताव सादर करत असतात. ही कथा आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत, अ जीवनातील कठोर वास्तवात घेऊन जाते. आजही ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे आणि ZEE5 वर पाहता येते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

ह्या आभिनेत्याला राजामौलींच्या चित्रपटातून मिळाली ओळख, वडिलही आहेत या इंडस्ट्रीत मोठे स्टार

 

हे देखील वाचा