आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. तसेच आता हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. तर या चित्रपटाने आतापर्यत अनेक चित्रपटांचे बाॅक्स ऑफिसवर रेकॅार्ड मोडले आहेत.
आदित्य धर (Dhar)दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने जगभरात 1400 करोडचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, चिनी बाजारपेठेत प्रदर्शित न होता हा पराक्रम करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंग अभिनीत या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचे नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘धुरंधर २’ एक मोठी घटना घडवली आहे. परदेशी बाजारपेठांमध्ये या चित्रपटाने 7 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली, जी पहिल्या वीकेंडपर्यंत 22 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली.
धुरंधर 2 ने दुसऱ्या वीकेंडमध्ये चित्रपटाने पुन्हा वेग पकडला. मंगळवारी, चित्रपटाने परदेशात जवळपास 1 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली होती, ज्यामुळे त्याचे एकूण आंतरराष्ट्रीय कलेक्शन 38.4 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचले. उत्तर अमेरिकेसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये, या चित्रपटाने ‘बाहुबली 2’ चा नऊ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे. सध्या, ‘धुरंधर 2’ चे एकूण जागतिक कलेक्शन 1435 कोटी रुपये आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ने 2017 मध्ये हा टप्पा ओलांडला होता. पण आता हा रेकॅार्ड ही धुरंधर 2 या चित्रपटांने मोडला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘भूत बंगला’ रिलीजआधी सासू डिंपल कपाडियांसोबत अक्षय कुमारने घेतले महाकालेश्वरचे दर्शन










