रणबीर कपुर अभिनीत रामायाण हा चित्रपट आहे. तर ‘रामायण’ हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिक नितेश तिवारी हे आहेत. तर चित्रपटांबाबत छोटी आतुरता संपेली आहे कारण चित्रपटाचे निर्माते, 2 एप्रिल रोजी म्हणजेच हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ‘रामा’ नावाने चित्रपटाची पहिली झलक अधिकृतपणे प्रदर्शित केली आहेत. तर या चित्रपटाचा टिझर प्रदर्शीत होताच अनेक कलाकारांनी या टिझरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आता, टेलिव्हिजनवरील रामायण सिरीयल मधील ‘ओजी सीता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपिका चिखलियाने, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या मेगा-बजेट चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’मधील रणबीर कपूरच्या प्रभू रामाच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तिने टीझरमधील प्रमुख वैशिष्ट्ये उघड केली. दीपिकाने मिडीयाशी बोलताना सांगितले, “मी टीझर पाहिला, आणि तो खूप भव्य आहे. तो खूप श्रीमंत दिसतो. त्याने ते खूप छान केले आहे.” ती पुढे म्हणाली, “त्यामुळे आता मी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे, आणि तो अगदी सुंदर दिसतोय, यात काही शंका नाही.
टीझरमध्ये रणबीर कपूरला “मर्यादा पुरुषोत्तम राम” प्रभुचे पात्र साकारताना दिसत आहे. सोबतच साई (sai)पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. इतकेच नाही, तर टीझरमध्ये यशच्या “रावणाच्या” जगाचीही एक झलक पाहायला मिळते आहे. तर या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी 2026 ला प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा









