आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग स्टारर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट 18 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये सशुल्क प्रिव्ह्यूसाठी प्रदर्शित झाला. धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. आणि धुरंदर 2 ने देखील ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई केली होती. आदित्य धर दिग्दर्शक हा चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना आवडला आहे तरी यावर त्यांनी प्रतिक्रिया ही दिले आहेत. धुरंदर 2 या चित्रपटाने आतापर्यंत उत्तम कमाई करत अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केले आहेत आणि प्रेक्षकांच्या मनात भर निर्माण केले आहेत अशा चित्रपटांना या चित्रपटाने अगदी कमी कालावधीत कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे
‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या कमाईपलीकडे, त्याची कथा आणि गाणीसुद्धा लक्षणीय लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपटातील एक गाणे आजच्या काळात एक भावनिक गीत बनले आहे आणि लोक ते पुन्हा पुन्हा ऐकत आहेत.चित्रपटात अनेक लोकप्रिय गाणी असली तरी, हे एक गाणे त्या सर्वांवर मात करत आहे. ते भावनांनी ओतप्रोत भरलेले आहे, जे जसकिरत सिंग रंगीची वेदना व्यक्त करण्यास पुरेसे आहे.
तर हे गाणे म्हणजे, “मन अटकेया बेपरवाह दे नाल, जे शशवत सचदेव यांनी गायले आहे आणि संगीतबद्धही केले आहे. या गाण्यात वैभव गुप्ता, शहजाद अली आणि टोकन यांच्या जादुई आवाजांचाही समावेश आहे. टी-सीरीजने या गाण्याच्या दोन आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत, एकाला 26 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि दुसऱ्याला 17 लाख. मात्र, हे गाणे मूळ नाही, ही एक पुनर्रचित आवृत्ती आहे. मूळ आवृत्ती प्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली खान (Khan)यांनी गायली होती. 1992 मध्ये रेकॉर्ड केलेले हे एक सुफी गाणे होते, ज्याच्या गीतांमधून मानवी भावना टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










